

Marathwada Politics News : आधी नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीचाच डंका वाजताना दिसतं आहे. 'मिनी मंत्रालय' कोण चालवणार? याचा निकाल आज लागला. मराठवाड्यातील लातूर, धाराशीव, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या चारही जिल्हा परिषदेमध्ये महायुतीतील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सरशी झाली आहे. कुठे शिवसेना, तर कुठे भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. तर कुठे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मित्र पक्षांना मागे टाकले आहे.
जिल्हा परिषदेसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान झाले. सोमवारी (ता.09) निकालाला सुरूवात झाली आणि अपेक्षित कल समोर येऊ लागले. दुपार पर्यंत मराठवाड्यातील चारही जिल्हा परिषदांवर महायुतीचा झेंडा फडकणार हे स्पष्ट झाले. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर प्रचारावर शोककळा पसरली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते झेडपीच्या प्रचारात उतरले नव्हते. अशा परिस्थितीत स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी झेडपीचे मैदान मारले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या 63 जागांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. त्यानूसार गेल्यावेळी प्रमाणेच यंदाही भाजप हा 22 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. दुसऱ्या क्रमांकावर शिंदेची शिवसेना आहे, या पक्षाने ग्रामीण भागात आपली ताकद सिद्ध करत 19 जागा जिंकल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राहिला आहे. महापालिकेत सहा जांगावर अडकलेल्या या पक्षाने जिल्हा परिषदेत 8 सदस्य निवडून आणत चुणूक दाखवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांना मात्र फारशी चमक दाखवता आलेली नाही. अनुक्रमे 2 आणि एक जागा या पक्षांच्या वाट्याला आल्या आहेत. तर गेल्या जिल्हा परिषदेत 16 सदस्य असलेल्या काँग्रेसची या निवडणुकीत मोठी पिछेहाट झाल्याचे पहायला मिळाले. एका जागेसह काँग्रेसला कसेबसे खाते उघडता आले आहे.
वंचित, एमआयएमला या निवडणुकीत आपला प्रभाव दाखवता आलेला नसला तरी 7 अपक्षांनी बाजी मारली आहे. शिवसेना-भाजप या दोन पक्षांनी निवडणुकीत युती जाहीर केली होती. परंतु ऐनवेळी दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांना बहुतांश ठिकाणी बी फाॅर्म दिले होते. त्यामुळे ही कागदावरची युती आता सत्तेसाठी प्रत्यक्षात पुन्हा येणार आहे.
एकूण जागा 63
भाजप : 22
शिवसेना : 19
शिवसेना UBT: 8
NCP : 2
NCP SP : 1
काँग्रेस : 1
वंचित : 00
एमआयएम: 00
अपक्ष : 7
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.