Pankaja Munde : पंकजा मुंडें वेगळा पक्ष काढणार? संजय राऊतांनीही दिल्या शुभेच्छा म्हणाले, 'त्यांनी स्वत: पुढाकार घ्यावा...'

Sanjay Raut On Pankaja Munde : नाशिकच्या सिडको परिसरामध्ये वारकरी भवनाचा लोकार्पण सोहळा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा साठा केला तर एक वेगळा पक्ष वेगळा उभा राहील, असे वक्तव्य केलं होतं.
Pankaja Munde
Pankaja Munde Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र गोळा केलं तरी एक वेगळा पक्ष उभा राहील, असे वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यामुळे बीडसह राज्याच्या राजकारणात आता नवे वादळ निर्माण झाले आहे. यावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टोला लगावला आहे. राऊत यांनी, पंकजा मुंडे यांनी वेगळा पक्ष काढावा, आमच्या त्यांना शुभेच्छा असतील असे म्हटलं आहे.

पंकजा मुंडे यांनी रविवारी (ता.9) नाशिक येथे आयोजित वारकरी भवनातील कार्यक्रमात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. यावेळी त्यांनी, गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये वेगळा पक्ष उभा करण्याची ताकद आणि तितकी संख्या आहे. फक्त तेच गोळा केले तर वेगळा पक्ष निर्माण होऊ शकतो असे म्हटले आहे. त्यांचे हेच वक्तव्य भाजपला सूचक इशारा असल्याचे आता राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

यानंतर आता या वक्तव्यावरून राज्यात चर्चा सुरू असतानाच खासदार राऊत यांनी पंकजा मुंडेंनी याबाबत स्वत: पुढाकार घ्यावा, असे आवाहन केलं आहे. तसेच आमचे देखील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्रेम आहे आणि होतच असेही म्हटलं आहे.

Pankaja Munde
Pankaja Munde Politics : माझ्या बाबांचा गणपती दूध पित नव्हता! पंकजा मुंडेंचं सूचक विधान...

भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होण्यामागे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे मोठे योगदान होतं. पण आता सगळ वेगळं आहे. यातच जर पंकजा मुंडे यांना जर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या विचार धारेचा वेगळा पक्ष काढावा असे वाटतं असेल तर त्यांनी नक्कीच स्वत: पुढाकार घ्यावा, आमच्या पूर्ण शुभेच्छा आहेत, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?

नाशिकच्या सिडको परिसरामध्ये वारकरी भावनांच्या लोकार्पण सोहळ्याला पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली. त्याच्या हस्तेच याचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी आपण वारकरी संप्रदायतील लोक असून आपला माफ करणे हा गुणधर्म असल्याचे म्हटले. तर जुगारी कार्यकर्ते सांभाळण्यापेक्षा वारकरी कार्यकर्ते सांभाळणे चांगले असे त्यांनी म्हटले.

Pankaja Munde
Pankaja Munde Video : '...तर गोपीनाथ मुंडेवर प्रेम करणाऱ्यांचा वेगळा पक्ष उभा राहील', पंकजा मुंडेंनी जाहीर भाषणात सांगितले

याचवेळी त्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे आठवण काढताना, मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या जन्मापासून काम केले आणि तो पक्ष वाढवला, उभा केला. लोक मुंडे साहेबांच्या गुणांवर प्रेम करतात. यामुळे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा फक्त साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आहे. तेवढी ताकद मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com