Ashish Shelar : भाजपच्या शिलेदारांचा कोकणावर पकड मजबूत करण्याचा इरादा; रवींद्र चव्हाणांसह आशिष शेलारही सक्रिय

BJp Active In Kokan : सध्या कोकणात भाजप ऑपरेश लोटस घडवून आणत असून दिग्गज नेते कोकणाकडे सरकरत आहेत. दोन एक दिवसांपूर्वी भाजपचे महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला होता.
Ravindra Chavan And Ashish Shelar
Ravindra Chavan And Ashish ShelarSarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg News : राज्यात महायुतीचे सरकार आले असून सर्वाधिक आमदार भाजपचे निवडून आले आहेत. यामुळे सध्या भाजपमध्ये चैत्यन्य असून कार्यकर्ते पक्षाच्या कामात गुंतले आहेत. अशातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे लोकसभा, विधानसभे वेळी जमले नाही. ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी करण्याची तयारी भाजप कोकणात करत आहे. कोकण हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र येथे एकनाश शिंदे यांच्या शिवसेनेसह भाजपने मुसंडी मारली आहे. सध्याच्या घडीला कोकणात उबाठाची शिवसेना संपूष्ठात येत आहे.

एकीकडे भाजपला शिवसेना संपवायची असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर देखील होल्ड मिळवायचा असल्याने कोकणात सध्या भाजप आपले हातपाय पसरत आहे. यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देण्यासह त्यांची थेट भेट नेते घेत आहेत.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी भाजपचे महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला होता. त्यांनी बांदा येथे कार्यक्रम घेत शिवसेना नेते आमदार नीलेश राणे यांनी घडवून आणलेल्या राजकीय भूकंपावर आपले लक्ष केंद्रीत केले होते. तसेच चव्हाण यांनी आपल्या नियोजित दौऱ्यातून जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कमळाशिवाय होऊ देऊ नका, असे सूचक वक्तव्य केलं होतं. सध्या याची चर्चा कोकणात जोरदार सुरू आहे.

अशातच मंत्री आशिष शेलार यांनी देखील कोकणात दौरा करून थेट भाजप कार्यर्त्यांनी संभ्रमात राहू नका अशा सक्त सूचना केल्या आहेत. यामुळे भाजपला आता कोकण सर करायचा असून शतप्रतीशत कमळ अशा टॅगलाईन खाली काम करायचे आहे. याची तयारी आता कोकणातून सुरू झाले आहे.

Ravindra Chavan And Ashish Shelar
Ravindra Chavan: भाजपकडून मंत्रिपदासाठी पत्ताकट, प्रदेश कार्याध्यक्षपदी वर्णी, हे प्रमोशन की डिमोशन? चव्हाणांनी आतली गोष्ट सांगितली

यावेळी सेलार यांनी भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांनी कानमंत्र दिलाच सोबत कानपिचक्याही मारल्या. त्यांनी, भाजप कार्यकर्त्यांनी बिलकुल संभ्रमात राहण्याची गरज नाही. भाजपहा केडरबेस पक्ष असून महायुती महायुतीतील पक्षांच्या भल्यासाठी आहे. त्यामुळे कोण आलं आणि कोण गेलं याकडे लक्ष देऊ नका. पक्षप्रवेश होतच राहतील आणि लोकही जातील. त्यामुळे कोण कुठे जावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तुम्ही सिंधुदुर्गात शतप्रतिशत भाजप म्हणून काम करा असा संदेश दिला. हे काम करताना तीळ मात्र शंका आणू नका असेही त्यांनी म्हटलं होतं.

तर अशिष शेलार असो किंवा रवींद्र चव्हाण हे सध्या कोकणाकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला संपवण्यासाठीच दौरे करत आहेत. असे नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटना बांधणीवरून शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्यातील रस्सीखेचवरून दौरे करत आहेत.

Ravindra Chavan And Ashish Shelar
Ashish Shelar: घाबरायचे कारण काय? शेलारांनी ठाकरेंना करून दिल्या जुन्या घटनांच्या आठवणी

सिंधुदुर्ग येथे चार दिवसांपूर्वी (ता.21) शिवसेनेने मेळावा घेत कुडाळ, सावंतवाडी तालुक्यात भाजपला धक्का दिला होता. येथे आमदार नीलेश राणे यांनी भाजपच्या 18 सरपंच, 12 शक्ती केंद्रप्रमुख तसेच सावंतवाडी तालुक्यातील सरपंच, उपसरपंचांचा प्रवेश घडवून आणला होता. यावरून चव्हाण यांनी सिंधुदुर्ग गाठत परिषद, ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कमळाशिवाय होऊ देऊ नका असे आदेशच भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com