
Disha salian Case : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन दिवसांपासून दिशा सालियान मृत्यू प्रकरण गाजत आहे. तिच्या वडिलांनी न्यायालयात दाखल केलेल्या नव्या याचिकेमुळे या प्रकरणाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. माजी मंत्री, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांना या मृत्यू प्ककरणात अटक करावी आणि त्यांची चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे.
याच प्रकरणावरून गुरुवारी (20 मार्च) दोन्ही सभागृहात जोरदार राडा झाला. विधान परिषदेत शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी या विषयावर चर्चा घडवून आणली. त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी खिंड लढवली. तसेच कायंदे यांचे जुने ट्विट वाचून दाखवत त्या सरड्याप्रमाणे रंग बदलत असल्याची टीका केली. याचवेळी त्यांनी मनिषा कायंदे आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यातही त्यांनी हळूच काडी टाकली.
अनिल परब यांनी मनीषा कायंदे यांचे जुने ट्विट सभागृहात वाचून दाखवले. आदित्य ठाकरे यांना सीआयडीने क्लिनचीट दिल्यानंतर मनीषा कायंदे यांनी ट्विट करत भाजप आणि राणेंवर टीका केली होती. त्यावेळी त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात होत्या.
'सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं' त्याची प्रचिती देशवासीयांना आलेली आहे. दिशाचा मृत्यू अपघातानेच झालेला असल्याचे सीबीआयच्या अहवालात उघड झाले आहे. पण भाजप आणि राणे गँगने बादरायण संबंध जोडून थयथयाट केला. आरोप करणाऱ्यांनी आता आदित्य ठाकरे यांची नाक घासून माफी मागायला पाहिजे.' असे ते ट्विट होते.
परब पुढे म्हणाले, मनीषा कायंदे आता वरिष्ठांना खूश करण्यासाठी आरोप करत आहेत. त्यांची नजर आता उपसभापतिपदावर आहे. सरड्यापेक्षा जास्त रंग बदलला. सरड्याला पण शरम वाटली असेल, अशी टीकाही त्यांनी केली.
नीलम गोऱ्हे या 2002 पासून सलग विधान परिषदेवर निवडून येत आहेत. 2002, 2008, 2014 आणि 2020 अशी त्यांची ही चौथी टर्म आहे. त्यांची आमदारकीची मुदत 13 मे 2026 रोजी संपत आहे. त्यानंतर त्यांचे उपसभापतीपदही रिक्त होईल. याच खुर्चीवर कायंदे यांची नजर असल्याचा दावा परब यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.