Abhijeet Dipke: "देवेंद्र फडणवीस ऐकताय का? मी पुन्हा येईन...."; अभिजीत दिपकेंचं शिवाजी पार्कमधून थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान

Abhijeet Dipke: भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीनं आज मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात जेलभरो आंदोलन केलं.
Abhijeet Dipke at Shivaji Park
Abhijeet Dipke at Shivaji Park
Published on: 
Updated on: 

Abhijeet Dipke: भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीनं आज मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात जेलभरो आंदोलन केलं. या आंदोलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला, मोठ्या संख्येनं तरुणाई या ठिकाणी गोळा झाली होती. यामध्ये अनेक नागरिकांनीही सहभाग नोंदवला. मुंबईत आंदोलनाला आलात तर तीन दिवस तुरुंगात राहावं लागेल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. यावरुन त्यांचाच डायलॉग मी पुन्हा येईन...असं म्हणत अभिजीत दिपकेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिलं.

फडणवीसांची खुर्ची कधी पडेल...

दिपके म्हणाले, "देवेंद्र फडणवीस साहेब ऐकत आहात का? फडणवीस साहेब हे तुमच्यासाठी आहे. तुम्ही म्हणाला होतात की, आंदोलनाला जाल तर एवढा विचार करुन जा की तीन दिवस तुरुंगात राहावं लागेल. पण तुम्हाला वाटतं का की कोणी घाबरलं आहे इथं? इथं जमलेले लोक तुम्हाला आमदार वाटले का? की तुम्ही धमकी दिली तर पळत तुमच्याकडं येतील. बरं झालं तीनच दिवस म्हटलात एक महिना म्हणाला नाहीत, नाहीतर मुंबई बंद पडली असती. तुमच्या खुर्चीचा एक पाय तर आधीच फेविस्टिकनं चिकटवलेला पाय आहे. कधी तो पाय पडेल आणि तुमची खुर्ची पडेल काही सांगता येत नाही"

Abhijeet Dipke at Shivaji Park
MPSCच्या सचिवांची अखेर बदली! मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळलं; विद्यार्थ्यांच्या लढ्याला मोठं यश

मी पुन्हा येईन....

"देवेंद्र फडणवीस साहेबांना एक विनंती आहे स्पेशल तुमच्यासाठी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तुम्ही! या महाराष्ट्राला काही वारसा आहे. जिजाऊ, सावित्रीबाई, आंबेडकर, शाहू, फुले यांचा महाराष्ट्र आहे हा. तुम्ही विसरले असाल पण आम्ही विसरणार नाहीत. ज्या महाराष्ट्राचा काही वारसा आहे, तिथं लहान मुलींना अशा धमक्या दिल्या जात नाहीत. काय म्हणाला होतात तुम्ही की तीन दिवस आंदोलन कराल तर तुरुंगात जावं लागेल. याचा अर्थ तुम्हाला तुरुंगात टाकायचं होतं का? तीन दिवस नाही तीन महिने तुरुंगात ठेवाल. पण तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मी तीच गोष्ट म्हणेल जी तुम्ही म्हणत होता, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन"

Abhijeet Dipke at Shivaji Park
Marathwada Irrigation: मराठवाड्याच्या 16 वर्षे रखडलेल्या सिंचन अनुशेषाचा मुद्दा पुन्हा हायकोर्टात! मुख्य सचिवांसह प्रतिवादींना नोटीस

सेलिब्रेटीजची हजेरी

दरम्यान, शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणावर सीजेपीच्या समर्थनार्थ आंदोलकांनी गर्दी केली होती. यामध्ये काही बॉलिवूड कलाकारांनी देखील व्यासपीठावर हजेरी लावली. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा, ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेते अतुल कुलकर्णी आणि गायक-संगितकार विशाल ददलानी यांचा समावेश होता. यावेळी ददलानी यांनी आंदोलक तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी काही गाणीही सादर केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com