MLC Election : विधानपरिषद निवडणूक 2026 : उद्धव ठाकरेंचा नकार? बाळासाहेब थोरातांचे नाव चर्चेत

MLC Election Maharashtra : विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत उमेदवारीवरून चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे, अंबादास दानवे आणि बाळासाहेब थोरात यांची नावे आघाडीवर आहेत.
Maharashtra MLC elections heat up as Maha Vikas Aghadi faces internal tussle. Debate over Uddhav Thackeray, Ambadas Danve or Balasaheb Thorat intensifies.
Maharashtra MLC elections heat up as Maha Vikas Aghadi faces internal tussle. Debate over Uddhav Thackeray, Ambadas Danve or Balasaheb Thorat intensifies.Sarkarnama
Published on
Updated on

MLC Election Maharashtra : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, राज्यसभा निवडणूक आणि विधानसभा पोटनिवडणुकीचा उडालेला धुरळा शांत होत असतानाचा विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचे वातावरण तापले आहे. विधानसभेतील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता सत्ताधारी महायुतीचे पारडे जड दिसत आहे. या 9 जागांपैकी तब्बल 8 जागा महायुती सहज जिंकेल असे चित्र आहे. यामध्ये भाजप 5, शिवसेना 2, आणि राष्ट्रवादी काँग्रेस 1 जागा जिंकू शकते.

दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे 46 आमदार आहेत. त्यामुळे त्यांचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. या जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केला आहे. पण उद्धव ठाकरे यांनीच पुन्हा निवडणूक लढवावी अशी अट काँग्रेसने टाकली आहे. मात्र उद्धव ठाकरे ही निवडणूक लढण्यास उत्सुक नसून ते विधानपरिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नावासाठी आग्रही असल्याची माहिती आहे.

मात्र, काँग्रेसकडून दानवे यांच्या नावाला विरोध होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे ही निवडणूक लढणार नसतील तर ही जागा काँग्रेसने मागितली असल्याचे सांगितले जाते. ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासाठी ही जागा हवी असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीत सुरु असलेल्या या घडामोडींमुळे विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट आला आहे.

Maharashtra MLC elections heat up as Maha Vikas Aghadi faces internal tussle. Debate over Uddhav Thackeray, Ambadas Danve or Balasaheb Thorat intensifies.
Shivsena MLC Election: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; माजी मंत्री अन् कट्टर भाजप विरोधक नेत्याला विधानपरिषदेची उमेदवारी?

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण तेव्हा ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने विधानपरिषदेचा मार्ग निवडला होता. परंतु गेल्या सहा वर्षाच्या आमदारकीच्या कालावधीत ठाकरे हे अल्प काळ विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी झाल्याने विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य झाले होते.

उद्धव ठाकरे विधानपरिषदेत सदस्य म्हणून पुन्हा निवडून आल्यास त्यांनी सभागृहात ठाण मांडून कामकाजात सक्रिय सहभाग दाखवून विरोधी पक्षाचे नेतृत्व करण्याची अपेक्षा विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येते. सभागृहातील वादविवाद, विधेयकांवरील चर्चा यातूनच नेत्यांचे संसदीय कामकाजातील एक व्यक्तिमत्त्व घडत असते, जे राजकीय व्यक्तिमत्त्वापेक्षा वेगळे असते.

Maharashtra MLC elections heat up as Maha Vikas Aghadi faces internal tussle. Debate over Uddhav Thackeray, Ambadas Danve or Balasaheb Thorat intensifies.
MLC Election : विधानपरिषदेत पुण्याची लॉटरी लागणार? ‘या’ नेत्यांना आमदार झाल्यासारखं वाटतंय, नावे आली समोर...

या सगळ्या घडामोडींमुळे उद्धव ठाकरे विधानपरिषदेची निवडणूक पुन्हा लढणार का? की दानवे यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेसला तयार करणार? की दानवे यांच्या नावाला विरोध करून काँग्रेस ही जागा पदरात पाडून घेणार? हे बघणे महत्त्वाचे आहे. काँग्रेसला सुटल्यास बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com