MLC Election 2026 : मोठी बातमी: बच्चू कडू पुन्हा आमदार होणार, शिवसेनेकडून विधानपरिषदेची ऑफर? एकनाथ शिंदे धमाका करण्याच्या तयारीत

Shivsena News: राज्यात 12 मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी 23 एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. संख्याबळाच्या गणितानुसार, नऊपैकी पाच जागा भाजप,दोन शिवसेना,एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि उर्वरित एक जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक जागेसाठी चुरस वाढणार हे निश्चित मानलं जात आहे.
Bachchu Kadu Eknath Shinde Shivsena
Bachchu Kadu Eknath Shinde ShivsenaSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News: विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत महत्त्वाच्या नेत्यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यात माजी मंत्री व प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांचाही समावेश आहे. पण विधानसभा निवडणुकीतील पराभव शेतकरी कर्जमाफी यांसह विविध मुद्दयांवरुन आंदोलनं,मोर्चे यांनी पुन्हा एकदा राजकारण तापवण्यास सुरुवात केली आहे.त्यांनी शेतकर्‍यांसाठी सुरु केलेला लढा हा अधिक टोकदार करत सरकारला जेरीस आणलं होते.पण याचवेळी बच्चू कडू यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मोठी ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी होणारी निवडणूक यंदा प्रचंड चुरशीची होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतही विधानपरिषदेसाठी अनेकजण इच्छुक असल्याचं समोर आलं होतं. अशातच विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेत ‘धक्कातंत्रा’ची शक्यता वर्तवली जात आहे. आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून थेट माजी मंत्री व प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंना ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर कडू आणि शिंदे यांच्यात मुंबईत भेट झाल्याचीही सूत्रांची माहिती आहे. मात्र, कडू यांनी शिंदेंना कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं सांगितल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर दिली गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू आहे.पण या संदर्भात अधिकृत आणि ठोस माहिती पुढे आलेली नाही. बच्चू कडू यांनी सुरवातीला एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा दिला होता आणि ते सुरवातीच्या काळात त्यांच्यासोबत होते.

परंतू,नंतरच्या काळात बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंच्या काही भूमिकांवर,विशेषतः शिवसेनेवरील दाव्यांवर उघडपणे नाराजी दर्शवली होती. त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले इथपर्यंत ठिक होतं. पण धनुष्यबाण आणि शिवसेनेवर शिंदेंनी ठोकलेला केलेला दावा हा टाळायला हवा होता,असं विधान बच्चू कडू यांनी म्हटलं होतं.त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

Bachchu Kadu Eknath Shinde Shivsena
Mahesh Shinde : भाजपच्या बड्या नेत्याचा शिवसेना आमदाराला शब्द : महेश शिंदे जी भूमिका घेतील, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू...

तसेच ऑक्टोबर 2024 मध्ये,बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे आमदार राजकुमार पटेल यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.यामुळेही शिंदेंची शिवसेना आणि बच्चू कडू यांच्या वादाची ठिणगी पडली होती. पण आता राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून कडूंना विधान परिषदेची ऑफर दिली गेली असल्यास,ती महायुतीमधील जागावाटप आणि समतोल राखण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असू शकते.

राज्यात 12 मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी 23 एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. संख्याबळाच्या गणितानुसार, नऊपैकी पाच जागा भाजप,दोन शिवसेना,एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि उर्वरित एक जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक जागेसाठी चुरस वाढणार हे निश्चित मानलं जात आहे.

Bachchu Kadu Eknath Shinde Shivsena
TCS Nashik Case : कॅन्सरग्रस्त बापासाठी हिंदू तरुणीने सोसला कार्पोरेट जिहाद, नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी..

महायुतीत शिवसेनेकडे असलेल्या दोन जागांपैकी किमान एक जागा पुण्याला मिळण्याची दाट शक्यता आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे नाव आघाडीवर असले,तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘धक्कातंत्रा’मुळे एखादे अनपेक्षित नाव पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या शर्यतीत रवींद्र धंगेकर,डॉ.रोहित टिळक यांच्यासह शिंदेंना सुरुवातीपासून साथ देणारे नाना भानगिरे हेही प्रयत्नशील आहेत.तर दुसर्‍या जागेसाठी शिवसेनेकडून धक्कातंत्र वापरले जाऊ शकते.

काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांनी आपण शिक्षक पदवीधरची निवडणूक लढवणार असल्याचेही संकेतही दिले होते. शिक्षक पदवीधरची निवडणूक लढवण्यासाठी सध्या चाचपणी सुरु असून वीस हजार की तीस हजार मतं आहेत, त्या 20 हजार शिक्षकांशी बोलणार आहे. ते हो म्हणाले तर लढणार आहोत,असंही बच्चू कडू यांनी सांगितलं. त्यामुळे कडू हे आता शिक्षक पदवीधर मतदारसंघातून आमदारकी लढवणार असल्याचे एकप्रकारे संकेतच त्यांनीच दिले होते.

Bachchu Kadu Eknath Shinde Shivsena
Congress News: मराठवाड्याच्या 'राजधानी'त पंधरा वर्षांत एकही खासदार,आमदार जिंकला नाही; तरी काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी तब्बल 35 इच्छुक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com