Co-Operative Elections: स्थगिती उठली, राजकारण पेटले! ‘गोकुळ’सह सहकार क्षेत्रात मोठी चुरस

Co-operative politics Maharashtra: न्यायालयानं स्थगिती दिलेल्या सहकारी संस्था वगळून उर्वरित ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्या सर्व संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं उठवली आहे.
Indapur Primary Co-operative Credit Society election
Indapur Primary Co-operative Credit Society electionSarkarnama
Published on
Updated on

Cooperative sector political battle Maharashtra: न्यायालयानं स्थगिती दिलेल्या सहकारी संस्था वगळून उर्वरित ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्या सर्व संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं उठवली आहे. त्यामुळं राज्यातील ११ हजार ४१ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

यामध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड अर्थात गोकूळच्या निवडणुकीसह इतर सर्वच निवडणुकांचा समावेश आहे. त्यामुळं नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर आता सहकारी संस्थांच्या निवडणुकांचं धुमशान सुरु होणार आहे.

Indapur Primary Co-operative Credit Society election
मराठी भाषा दिन : बाबासाहेबांना पाठिंबा अन् कुसुमाग्रजांच्या कवितांचा बदलला प्रवाह

प्राधिकरणानं नेमकं काय म्हटलंय?

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं काढलेल्या आदेशानुसार, अ व ब वर्गातील सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम ज्या टप्प्यावर स्थगिती देण्यात आली होती, तिथूनच पुढे या निवडणुका नियमातील तरतुदींप्रमाणं घेण्यात यावी. यासाठीचा प्रस्ताव संबंधित सहकारी संस्थांनी मान्यतेसाठी प्राधिकरणाकडं पाठवावा.

तसंच अ, ब, क, ड या वर्गातील सहकारी संस्थांनी निवडणुकीसाठीच्या तात्पुरत्या मतदार याद्या तयार कराव्यात त्यासाठी १ फेब्रुवारी २०२६ हा कट ऑफ दिनांक देण्यात आला आहे. म्हणजेच या तारखेपर्यंतच्या मतदार याद्या ग्राह्य धरल्या जातील. या वर्षी ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्यांच्यासाठी २४ फेब्रुवारी २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे.

Indapur Primary Co-operative Credit Society election
CM Grandson Death: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचा संशयास्पद मृत्यू! मित्रांसोबत ट्रिपला गेलेला असताना घडली घटना

वर्गनिहाय निवडणूक संख्या

यामध्ये सहकारी संस्थांच्या वर्गनिहाय निवडणुकांमध्ये ७४ 'अ' वर्ग सहकारी संस्था, १,३३३ 'ब' वर्ग सहकारी संस्था, ३,९४१ 'क' वर्ग सहकारी संस्था, ५,६९३ 'ड' वर्ग सहकारी संस्थांचा समावेश आहे. या सर्व मिळून ११,०४१ इतक्या सहकारी सस्थांच्या निवडणुका आता होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com