MPSC Scam : MPSC घोटाळा दाबण्याचा प्रयत्न? चौकशी अहवाल दिशाभूल करणारा; बड्या पोलिसावर टांगती तलवार!

MPSC scam latest news Maharashtra : MPSC घोटाळ्याच्या चौकशी अहवालावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अहवाल दिशाभूल करणारा असल्याचा आरोप असून बड्या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेची चर्चा सुरू आहे.
MPSC scam latest news Maharashtra
MPSC scam latest news Maharashtra
Published on
Updated on

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पदाच्या परीक्षेतील गोपनीय कागदपत्रे उघड झाल्याच्या तक्रारीवरून करण्यात आलेल्या चौकशीला आता नवे वळण मिळाले आहे. चौकशी अहवालात चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती नमूद केल्याचा ठपका ठेवत नागपूर पोलिस दलातील पोलिस निरीक्षक राहुल शिरे यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या अहवालात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख करण्यात आल्याचे चौकशीत समोर आले आहे.

रविंद्र दिनकर इंगोले यांच्यासह काही उमेदवारांनी 3 जानेवारी 2026 रोजी परीक्षेतील गुणांकनासंदर्भातील गोपनीय कागदपत्रे उघड झाल्याचा आरोप करत पोलिस उपआयुक्त (गुन्हे शाखा), नागपूर शहर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची चौकशी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक राहुल शिरे यांच्याकडे सोपविण्यात आली.

MPSC scam latest news Maharashtra
Dr Apoorva Heere: शिक्षकाच्या मृत्यूनं हिरे-भुसे संघर्षाला नवा ट्विस्ट! मालेगावचं राजकारण तापलं; शिक्षण विभागावर गंभीर आरोप

शिरे यांनी 3 एप्रिल 2026 रोजी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिस उपआयुक्तांना अहवाल सादर केला. मात्र, याआधी गुन्हे शाखा, कक्ष-2, नवी मुंबई येथील पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनीही या प्रकरणाची चौकशी केली होती. पाटील यांनी दूरध्वनीवरून दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या चौकशीत संयुक्त आयुक्त आणि उत्पादन शुल्क विभागातील इतर अधिकारी दोषी असल्याचा अहवाल पाठविण्यात आला होता.

या प्रकरणाच्या पुढील चौकशीदरम्यान राहुल शिरे आणि अनिल पाटील यांच्यातील दूरध्वनीवरील संभाषणाची ध्वनिफीतही तपासण्यात आली. त्याची पडताळणी केल्यानंतर शिरे यांनी सादर केलेल्या अहवालात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांचा उल्लेख असल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे MPSC परीक्षेतील गोपनीय कागदपत्रे उघड झाल्याच्या प्रकरणात आयोगाच्या सचिवांवर दोष ठेवणारी माहिती चुकीची आणि दिशाभूल करणारी असल्याचे चौकशीत नमूद करण्यात आले आहे.

MPSC scam latest news Maharashtra
Stalin Vijay Row : मारहाणीत माझ्या जबड्याचे हाड मोडले..! CM विजय यांच्या विधानसभेतील कृतीनं स्टॅलिन दुखावले अन् सगळं सांगितलं...

आता ही माहिती अहवालात नेमक्या कोणत्या उद्देशाने नमूद करण्यात आली, याचा तपास विभागीय चौकशीच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक राहुल शिरे यांच्यावरील कारवाईकडे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे MPSC परीक्षा, गोपनीय कागदपत्रे आणि चौकशी अहवालाच्या विश्वासार्हतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com