MSRTC Employees Diwali Salary : एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पगार; पण पीएफ, ग्रॅच्युइटीचे काय? 391 कोटींच्या निधीवरून नवा वाद!

MSRTC employees may get their Diwali salary after Maharashtra approves Rs 391.02 crore. Find out why PF, gratuity and other dues remain a concern : राज्य सरकारकडून सप्टेंबरमधील प्रवासी सवलतींच्या प्रतिपूर्तीसाठी 391.02 कोटी मंजूर; 83 हजार कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण वेतनासाठी 560 कोटींची गरज, श्रीरंग बरगे यांचा सरकारवर घणाघात.
MSRTC Employees Diwali Salary
MSRTC Employees Diwali SalarySarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra ST employees salary before Diwali : एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सप्टेंबरमधील प्रवासी सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला 391.02 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय मंगळवारी जारी करण्यात आला.

परंतु, वेतनासाठी सुमारे 560 कोटी रुपये आवश्यक असल्याने मंजूर निधीतून केवळ निव्वळ वेतन देता येईल. भविष्य निर्वाह निधी (पीएफ), उपदान (ग्रॅच्युइटी) आणि इतर वैधानिक देयके देता येणार नाहीत. त्यामुळे महामंडळ प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.

एसटी महामंडळातील सुमारे 83 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. कर्मचाऱ्यांना साधारणतः दर महिन्याच्या 7 ते 10 तारखेदरम्यान वेतन दिले जाते. यंदा 6 नोव्हेंबरपासून दिवाळी सुरू होत असल्याने सणापूर्वी वेतन मिळावे, यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी पाठपुरावा केला होता.

वेतन वितरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. एसटी महामंडळाकडून महिला (Women) सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिकांसह विविध प्रवासी सवलतींची अंमलबजावणी केली जाते. या सवलतींपोटी शासनाकडून महामंडळाला प्रतिपूर्ती दिली जाते. सप्टेंबर 2026 मधील सवलतींच्या प्रतिपूर्तीसाठी 391.02 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

MSRTC Employees Diwali Salary
Rahul Gandhi Tata Group : ‘टाटा समूहाला उद्ध्वस्त करताय’; राहुल गांधींचा मोदी-शाह यांच्यावर थेट हल्ला!

मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण वेतनासाठी सुमारे 560 कोटी रुपये आवश्यक असल्याने मंजूर निधीतून केवळ निव्वळ वेतन देता येईल. भविष्य निर्वाह निधी (पीएफ), उपदान (ग्रॅच्युइटी) आणि इतर वैधानिक देयके देता येणार नाहीत, असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.

MSRTC Employees Diwali Salary
Prithviraj Chavan on Kharge statement : खर्गेंना विरोध, भाजपवरही निशाणा; पृथ्वीराज चव्हाणांच्या भूमिकेने राजकीय चर्चेला नवे वळण

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी, अधिकारी आणि कर्मचारी हे महामंडळाचे खरे बळ आहेत. कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण आनंदाने साजरा करता यावा, यासाठी त्यांना सणापूर्वी वेतन मिळणे आवश्यक आहे. शासनाने निधी मंजूर केला असून, आता एसटी प्रशासनाने वेतन वितरणाची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत, असे सांगितले.

महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी, संपूर्ण वेतनासाठी 560 कोटी रुपये लागतात. एवढ्या कमी निधीतून केवळ निव्वळ वेतन दिले जाईल. पीएफ, ग्रॅच्युइटी आणि इतर वैधानिक देयके देता येणार नाहीत. सरकारने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा घणाघात केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com