मोठी अपडेट: ठाकरे बंधूंचे प्लॅनिंग ठरले; संयुक्त वचननामा, ऐतिहासिक सभा अन् महामुलाखत; मुंबई जिंकण्यासाठी 'मास्टर प्लॅन' तयार!

Mumbai BMC elections News : येत्या काळात राज-उद्धव ठाकरे हे संयुक्त वचननामा, ऐतिहासिक सभा अन् महामुलाखत घेणार आहेत. मुंबई महापलिका निवडणूक जिंकण्यासाठी 'मास्टर प्लॅन' तयार केला आहे.
Uddhav Thackeray & Raj Thackeray
Uddhav Thackeray & Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना कामाला लागली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज व उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. मनसे आणि शिवसेना ही निवडणूक एकत्रित लढत आहेत. आता प्रचारासाठी अवघा काही कालावधी उरला असतानाच मोठी अपडेट समोर येत आहे.

ठाकरे ब्रँड प्रचाराचा धुराळा उडवून देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठीच आता ठाकरे बंधूंनी मोठे प्लॅनिंग केले आहे. येत्या काळात राज-उद्धव ठाकरे हे संयुक्त वचननामा, ऐतिहासिक सभा अन् महामुलाखत घेणार आहेत. मुंबई महापलिका निवडणूक जिंकण्यासाठी 'मास्टर प्लॅन' तयार केला आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई महापलिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघ्या दहा दिवसाचा कालावधी उरला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात धावपळ सुरु आहे. त्यामुळेच येत्या काळात ठाकरे ब्रँड प्रचाराचा धुराळा उडवून देण्याच्या तयारीत आहे. राज ठाकरे हे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या भाषणाकडे सर्वांचेच लक्ष असते. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सुद्धा खास शैलीत भाषण करतात. आता या दोन्ही नेत्यांची संयुक्त मुलाखत घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्यांच्या सभेकडे लक्ष लागून राहिले आहे.

Uddhav Thackeray & Raj Thackeray
Bjp News : भाजपने मोठा डाव टाकला, बंडखोरी निम्मी संपली आता समर्थनासाठी...

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद 4 जानेवारीला होणार आहे. या पत्रकार परिषदेत ते दोन्ही पक्षांचा संयुक्त वचननामा प्रकाशित करणार असल्याचे समोर येत आहे. या वचननाम्यानंतर दोन्ही बंधु प्रचाराच्या रणधुमाळीत उतरतील. या पत्रकार परिषदेनंतर लागलीच त्यांची पहिली संयुक्त जाहीर सभा सुद्धा होणार आहे. त्यामुळे संयुक्त मुलाखत, संयुक्त पत्रकार परिषद, संयुक्त वचननामा आणि संयुक्त प्रचार सभा यातून प्रचाराचा नारळ फोडला जाईल.

Uddhav Thackeray & Raj Thackeray
Shivsena-MNS Manifesto: शिवसेना-मनसेचा वचननामा आला समोर! शहर वाचवण्याचं आवाहन, मुंबईकरांसाठी मांडले 'हे' महत्वाचे मुद्दे

मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या तीन संयुक्त सभा होत आहेत. पहिली सभा 6 जानेवारी रोजी होईल. ही सभा मुंबईतील पूर्व उपनगरात होणार आहे. दुसरी सभा पश्चिम उपनगरात तर तिसरी सभा मुंबईत होणार आहे. प्रचाराचा नारळ 6 जानेवारी रोजी फुटेल. तर तिसऱ्या सभेत प्रचाराची सांगता होईल. या सभांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray & Raj Thackeray
NCP Alliance: दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं ही आयडिया कोणाची? प्रस्ताव कोणी दिला? सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात सांगितलं

राज व उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत 6 जानेवारीला होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत घेण्याची जबाबदारी प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर सोपवण्यात आली असल्याचे समजते. ही केवळ मुलाखत नसून महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारा एक ऐतिहासिक दस्तऐवज असणार आहे.

मांजरेकरांचे 'रोखठोक' प्रश्न आणि ठाकरे बंधूंची 'ठाकरी' शैली यामुळे या मुलाखतीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. मनसे आणि शिवसैनिकांमध्ये चैतन्य भरण्यासाठी हा खास प्रयोग होत असल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत त्याचा किती फायदा होईल हे निकालानंतर स्पष्ट होईल. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray & Raj Thackeray
Congress-Shivsena UBT Alliance : पुण्यातील काँग्रेस-शिवसेना अन् मनसेच्या सर्व उमेदवारांची यादी... भाजपवर किती भारी?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com