Bjp News : भाजपने मोठा डाव टाकला, बंडखोरी निम्मी संपली आता समर्थनासाठी...

municipal elections Maharashtra News : राज्याचे महसूलमंत्री आणि नागपूर व अमरावतीचे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्ही शेवटपर्यंत बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
Revenue Minister Chandrashekhar Bawankule celebrating BJP’s first-ever municipal victory in Kamthi, as BJP-Shinde Sena alliance declares Ramtek Congress-free in Nagpur district.
Revenue Minister Chandrashekhar Bawankule celebrating BJP’s first-ever municipal victory in Kamthi, as BJP-Shinde Sena alliance declares Ramtek Congress-free in Nagpur district.Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : महापालिकेच्या निवडणुकीतून उमेदवारी मागे घ्यायची मुदत निघून गेली आहे. बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केले. जिल्ह्याजिल्ह्यात नेत्यांना पाठवण्यात आले होते. काही लोकांची समजूत काढण्यात यश आले तर काहींना स्पष्ट शब्दात नकार दिला. यानंतरही आज घडीला भाजपच्या बंडखोरांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येते. आता ज्यांनी माघार घेतली नाही त्यांचे समर्थन मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहे.

राज्याचे महसूलमंत्री आणि नागपूर व अमरावतीचे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्ही शेवटपर्यंत बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आता माघारीचे सर्व पर्याय संपले आहेत. ज्यांना उमेदवारी मिळू शकली नाही त्यांची नाराजी, राग स्‍वाभाविक आहे. प्रत्येक मागणाऱ्याला तिकीट देणे शक्य नाही. आता झाले गेले विसरून जे रिंगणात आहेत त्यांचे समर्थन आम्ही प्रयत्न करणार आहोत. मतदानाच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांची समजूत काढू असेही बावनकुळे यांनी सांगितले.

Revenue Minister Chandrashekhar Bawankule celebrating BJP’s first-ever municipal victory in Kamthi, as BJP-Shinde Sena alliance declares Ramtek Congress-free in Nagpur district.
Nitin Deshmukh Join BJP : गोपीचंद पडळकरांना नडणारा जितेंद्र आव्हाडांचा कट्टर कार्यकर्ता भाजपच्या गळाला

चंद्रपूरमध्ये भाजपच्या (BJP) जिल्हाध्यक्षांनी उमेदवारांची यादी परस्पर बदलली. त्याला शिक्षा देण्यात आली आहे. भाजपने त्याचे जिल्हाध्यक्षपद काढून घेतले आहे. भाजपने ज्यांना उमेदवारी दिली ते शंभर टक्के निवडून येतील. मी स्वतः त्यांच्या प्रचाराला जाणार आहे. सर्वांचीच समजूत काढली जाईल. आता तिकिटाचा विषय संपला आहे. भाजपचे अधिकाधिक नगरसेवक निवडून आणायचे असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

Revenue Minister Chandrashekhar Bawankule celebrating BJP’s first-ever municipal victory in Kamthi, as BJP-Shinde Sena alliance declares Ramtek Congress-free in Nagpur district.
Shivsena-MNS Manifesto: शिवसेना-मनसेचा वचननामा आला समोर! शहर वाचवण्याचं आवाहन, मुंबईकरांसाठी मांडले 'हे' महत्वाचे मुद्दे

राज्यात अनेक महापालिकेमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत (Shivsena) एकमेकांच्या विरोधात लढत आहे. मात्र याचा युतीवर काही परिणाम होणार नाही. आम्ही एकमेकांवर टीका टिपणी करण्याचे टाळणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी ते ठरवले आहे. मनभेद व मतभेद होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.

Revenue Minister Chandrashekhar Bawankule celebrating BJP’s first-ever municipal victory in Kamthi, as BJP-Shinde Sena alliance declares Ramtek Congress-free in Nagpur district.
NCP Alliance: दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं ही आयडिया कोणाची? प्रस्ताव कोणी दिला? सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात सांगितलं

मित्र पक्षाच्या विरोधात जरी लढलो तरी महायुतीत कुठलेही मतभेद होणार नाही सर्वांनी घ्यायची आहे. समन्वय समितीच्या बैठकीत हे ठरवण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंतच्या भाषणात कुठल्याही पक्षावर, कुठल्याही नेत्यांवर टीका केली नाही असाही दावा बावनकुळे यांनी केला.

Revenue Minister Chandrashekhar Bawankule celebrating BJP’s first-ever municipal victory in Kamthi, as BJP-Shinde Sena alliance declares Ramtek Congress-free in Nagpur district.
Congress-Shivsena UBT Alliance : पुण्यातील काँग्रेस-शिवसेना अन् मनसेच्या सर्व उमेदवारांची यादी... भाजपवर किती भारी?

काही नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात सर्वच पक्षाच्या नगरसेवकांचा समावेश आहे. मात्र सर्वाधिक अविरोध महायुतीचेच नगरसेवक कसे काय आले असा प्रश्न विरोधकांतर्फे विचारला जात आहे. याचे उत्तर सोपे आहे. महायुती विकासाचे राजकारण करते. ज्यांना आपल्या शहराचा, वस्तीचा विकास हवा आहे. त्यांनी महायुतीच्या विरोधात लढण्यास नकार दिला. स्वतःहून उमेदवारी मागे घेतली, असा दावाही बावनकुळे यांनी केला. कोणी कोणावरही दबाव टाकेल आणि उमेदवारी मागे घेईल, असे महाराष्ट्रात होत नाही. महाराष्ट्र हा प्रगल्भ आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले ते तिथल्या विकासाच्या विषयावर प्राधान्यावर घेतले आहेत. हा चांगला पायंडा असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

Revenue Minister Chandrashekhar Bawankule celebrating BJP’s first-ever municipal victory in Kamthi, as BJP-Shinde Sena alliance declares Ramtek Congress-free in Nagpur district.
NCP Alliance: दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं ही आयडिया कोणाची? प्रस्ताव कोणी दिला? सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात सांगितलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com