

Mumbai Political News: मुंबई महापालिकेच्या महापौरपदी रितू तावडे, उपमहपौरपदी संजय घाडी हे विराजमान झाले आहेत. मात्र, मुंबईत सत्तास्थापन करण्यापूर्वी पुढील पाच वर्षातील सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचे पुढे आले आहे. त्यानुसार सुरुवातीचे सव्वा वर्ष भाजपचा महापौर असणार आहे. त्यानंतरचे सव्वावर्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा महापौर असणार आहे, अशा प्रकारचा फॉर्म्युला या दोन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये ठरला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली आहे.
मुंबईतील महापौर व उपमहापौर यांच्या निवडीपूर्वी बऱ्याच राजकीय घडामोडी पडद्याआड घडल्या आहेत. सुरुवातीचे सव्वावर्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा महापौर असावा, अशी मागणी केली जात होती.
मात्र, भाजपने (BJP) त्यांचे नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून आल्याने सुरुवातीचे सव्वावर्ष भाजपचा महापौर व्हावा, यावर ठाम होते. त्यावेळी झालेल्या बैठकीत या दोन पक्षात सव्वा-सव्वा वर्षाच्या फॉर्म्युल्यावर एकमत झाले. त्यानंतर भाजपच्या रितू तावडे यांची महापौरपदी निवड झाली.
त्यामुळे आता सव्वा वर्षाची कारकीर्द पूर्ण होताच महापौर रितू तावडे या राजीनामा देणार आहेत. त्यानंतर पुढच्या सव्वावर्ष एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचा महापौर असणार असल्याचे समजते. मुंबई महापालिकेतील सत्ता स्थापन करण्यापूर्वी अशाप्रकारचा फॉर्म्युला ठरला असल्याचे आता पुढे आले आहे.
त्यासोबतच उपमहापौर संजय घाडी हे देखील सव्वा वर्षानंतर पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांच्या जागी भाजपचा उपमहापौर होणार असल्याची माहिती सूत्राने दिली. त्यासोबतच यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्याची बैठक २९ जानेवारीला जाहली होती. त्यामध्येच हा फॉर्म्युला ठरला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेतील या सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावर सीएम देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातही याबाबत चर्चा झाली असल्याचे समजते. त्यासोबतच या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये एकमत झाले आहे. मुंबईत सत्तास्थापन करून आठ दिवसाचा कालावधी झाल्यानंतर आता हा फॉर्म्युला पुढे आला आहे.
त्यासोबतच मुंबईत महापालिकेतील स्थायी समिती सभापती, बेस्ट सुधार समिती त्यासोबतच शिक्षण समितीचीच्या सभापती पदासाठी देखील भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत फॉर्म्युला ठरला आहे. मात्र, अद्याप याबाबतचा फॉर्म्युला पुढे आलेला नाही.
दरम्यान, बुधवारी मुंबई स्थायी समिती सभापतीपदी भाजपच्या प्रभाकर शिंदे यांची तर शिक्षण समितीचीच्या सभापती सभापतीपदी भाजपच्या राजश्री शिरवडकर यांची बिनविरोध निवड झाली तर त्यासोबतच बेस्ट समितीच्या सभापतीपदी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांची तर सुधार समितीच्या सभापतीपदी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका संध्या दोषी यांची वर्णी लागली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.