Mumbai Municipal Election: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठी उलथापालथ! माजी आमदाराच्या मुलाची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत एंट्री; समीकरण बदलणार?

, Uddhav Thackeray Shiv Sena news News : राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी सात दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. सर्वच पक्षाकडून प्रचारावर भर दिला जात आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून केल्या जात असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे वातावरण चांगलेच तापले आहे
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी सात दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. सर्वच पक्षाकडून प्रचारावर भर दिला जात आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून केल्या जात असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. टीका टिपणीमुळे प्रचाराचा जोर शिगेला पोहचला आहे. त्यातच आता मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अंधेरी भागातील काँग्रेसचे माजी आमदार अशोक जाधव यांचा मुलगा कुणाल जाधव यांनी उमेदवारी न मिळाल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

महापलिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्याचवेळी अंधेरी पश्चिममध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार अशोक जाधव यांचा मुलगा कुणाल जाधव यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. कुणाल जाधव प्रभाग क्रमांक ६७ मधून निवडणूक लढण्याची तयारी करीत होते. मात्र, त्याठिकाणी उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेस नेतृत्वावर नाराज असलेले कुणाल जाधव यांनी अखेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

Uddhav Thackeray
BJP Vs Shivsena : भाजपने तुटेपर्यंत ताणलं पण एकनाथ शिंदेंसोबतच युती केली; पडद्यामागं असं काय घडलं? देवेंद्र फडणवीसांनी सगळं सांगितलं

शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी मंत्री अनिल परब यांच्या मध्यस्थीने मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कुणाल जाधव यांनी शिवबंधन बांधत ठाकरेसेनेत अधिकृत प्रवेश केला. या प्रवेशामुळे अंधेरी पश्चिममधील काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Uddhav Thackeray
NCP candidate house threat : पवारांच्या उमेदवाराच्या घरासमोर दहशत; पिस्तूल घेऊन फिरणारे पोलिस निलंबित, तर तिघांविरोधात गुन्हा

मुंबईतील महापालिका निवडणुकीसाठी महायुती व ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मोठी रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. त्यातच काँग्रेस (Congress) व वंचित आघाडीची युती सोबतच अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली आहे. त्यामुळे या निवडणुकीत चुरस पाहवयास मिळत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश होत असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Uddhav Thackeray
BJP-Congress Alliance : CM फडणवीसांनी काँग्रेससोबतची युती लगेचच तोडली; मग रवींद्र चव्हाणांनी 24 तासांत सर्व 12 नगरसेवकांच्या गळ्यात टाकला 'भाजपचा' गमछा

दरम्यान, राज्यभरात भाजपकडून 'ऑपरेशन लोटस' राबविले जात आहे. हे ऑपरेशन लोटस आता अंबरनाथ नगरपालिकेत सत्तेत येण्यासाठी राबवले जात आहे. काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी केल्याने बुधवारी दुपारी तडकाफडकी 12 नगरसेवक निलंबित केले होते. आता निलंबित करण्यात आलेल्या या 12 नगरसेवकानी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Uddhav Thackeray
AIMIM BJP Alliance End : भाजप-एमआयएमची युतीवर इम्तियाज जलील यांचा मोठा निर्णय, अंमलबजावणी देखील लगेच झाली!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com