Mumbai News : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपताच आता कोणत्याही क्षणी राज्यातील 29 महानगरपालिकेसाठी निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. उर्वरित नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर सर्वच नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे. त्यातच महापालिका निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच राज्यातील घडमोडींना वेग आला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यांच्या पक्षातील बड्या नेत्याचा उद्या भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे समजते.
येत्या काळात राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आणि महापालिका निवडणुका होणार आहेत. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पक्षांतराला वेग आला आहे. अनेक इच्छूक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत. आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पुन्हा एकदा एक मोठा धक्का शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजप तसेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. दरम्यान, हे इनकमिंग अजूनही सुरूच आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यांच्या पक्षाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर या सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तेजस्वी घोसाळकर या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या आहेत. जर त्यांनी उद्या भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असणार आहे.
ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये पुन्हा एकदा पक्षप्रवेश होत आहेत. त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. सध्या भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे, मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटातील अनेक नेत्यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे सध्या शिवसेना शिंदे गट महायुतीमध्ये नाराज आसल्याची चर्चा आहे. सोमवारी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.