Mahayuti internal conflict : महायुतीमधील धुसफूस शिगेला! मुनगंटीवार, झिरवाळ, बडोले यांची नाराजी चव्हाट्यावर!

Zirwal Badole discontent News : महायुतीत धुसफूस शिगेला पोहचली आहे. या नाराज असलेल्या नेत्यामुळे येत्या काळात महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यातच नागपूरमधील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राज्यातील हिवाळी अधिवेशन सुरु होऊन सहा दिवस उलटले आहेत. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेता निवडला जात नसल्याने विरोधी पक्ष नाराज आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजप व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार नाराज असल्याचे पुढे आले आहे. भाजपमधील माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह आमदार राजकुमार बडोले नाराज असल्याने महायुतीत धुसफूस शिगेला पोहचली आहे. या नाराज असलेल्या नेत्यामुळे येत्या काळात महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यातच नागपूरमधील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

हिवाळी अधिवेशनकाळात प्रथमच राज्यातील महायुती सरकारवर विरोधी पक्षासह सत्तधारी पक्षातीलच नाराज आमदारांची समजूत काढावी लागत असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार आणि नरहरी झिरवाळ यांनी एफडीएच्या कामकाजावर शुक्रवारी जाहीर नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजकुमार बडोले यांनीही नाराजी बोलून दाखवली. त्यामुळे महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

Sudhir Mungantiwar
BJP Ex MLA Case : मतचोरीच्या गोंधळात भाजप नेत्यावर गुन्हा दाखल, एसआयटीनेच नाव घेतल्याने खळबळ

बहुजन समाज,अनुसूचित जाती-जमाती व मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांना सभागृह कामकाजात स्थान दिले जात नसल्याने बडोले सरकारवर नाराज आहेत. त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul narwekar) यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. कामकाजामध्ये सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विकास विभाग, बहुजन कल्याण विभाग व दिव्यांग कल्याण विभाग यांच्याशी संबंधित कोणत्याही प्रश्नांना स्थान देण्यात आले नाही.

Sudhir Mungantiwar
Shivsena News : शिवसेनेच्या तंबूत भाजप अन् मनसे इच्छुकांची घुसखोरी,अर्जही घेतले! चार तासांत पाचशे फाॅर्म संपले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व छत्रपती शाहू महाराजांनी शोषीत वंचित आणि बहुजन समाज हक्कांसाठी जे विचार मांडले त्यानुसार या समाजाशी निगडित प्रश्नांना सभागृहाच्या कामकाजात स्थान मिळणे अत्यावश्यक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आदिवासी व बहुजन समाज यांच्याशी संबंधित अनेक प्रश्न विविध आमदारांनी नियमानुसार दाखल केले असूनही त्या प्रश्नांना कामकाजात स्थान देण्यात आले नाही.

Sudhir Mungantiwar
Pune NCP Alliance : शरद पवारांच्या सूचनेनंतर पुण्यातील तंटा मिटवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष मैदानात उतरणार

ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असल्याचे माजी मंत्री व आमदार राजकुमार बडोले यांनी पत्रामध्ये म्हटले आहे. त्यामुळे ऐन अधिवेशन काळातच नाराजी उफाळून आली आहे. त्यामुळे आता येत्या काळात सत्ताधारी आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sudhir Mungantiwar
Congress president news : भाजपला अध्यक्ष सापडेनात, आता काँग्रेसमध्येही खळबळ; मल्लिकार्जून खर्गेंबाबत आमदाराचा ‘लेटरबॉम्ब’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com