BMC Election 2026 : मुंबईतील भाजपचा पहिला उमेदवार ठरला? उमेदवारांची घोषणा होण्यापूर्वीच 'हे' नाव आले समोर?

BJP first probable candidate News : भाजपच्या मुंबईतील पहिल्या संभाव्य उमेदवाराचे नाव समोर आले आहे. त्यामुळे आता सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचले आहे. या उमेदवाराच्या नावाची सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरू आहे.
Pune BJP
Senior BJP leaders discussing the Pune Municipal Election candidate list, as the party enforces a strict “no relatives” rule to promote merit-based politics.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दिन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आज रात्रीपासून उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना, मनसे, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व वंचित यांच्या उमेदवारांच्या यादीची घोषणा होऊ शकते.

त्याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच व भाजपने अद्याप मुंबईतील एकाही उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे भाजपच्या मुंबईतील पहिल्या संभाव्य उमेदवाराचे नाव समोर आले आहे. त्यामुळे आता सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचले आहे. या उमेदवाराच्या नावाची सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरू आहे.

आगामी काळात होत असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने (BJP) लक्ष्य निश्चित केले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना, भाजपने अद्याप आपली अधिकृत यादी प्रसिद्ध केलेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील एका अतिशय प्रतिष्ठेच्या वॉर्डातून एका बड्या नेत्याचे नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या भाजपच्या मुंबईतील पहिल्या संभाव्य उमेदवाराच्या नावाची चर्चा जोरात सुरु आहे.

Pune BJP
Shivsena Politics : शिवसैनिकांच्या आंदोलनानंतर नीलम गोऱ्हेंचा यू-टर्न: शिवसेनेनेच्या 25 उमेदवारांची यादी उदय सामंतांकडे

महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने (Shivsena) मुंबईत एकत्र निवडणूक लढवणार आहेत. या दोघांनी जागावाटपाचे सूत्र जवळपास निश्चित केले असले तरी भाजपने अद्याप मुंबईतील एकाही उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे भाजपच्या मुंबईतील पहिल्या संभाव्य उमेदवाराचे नाव समोर आले आहे.

Pune BJP
Congress strategy : महादेव जानकरांचा भाजपवर बॉम्बगोळा! महायुतीसोबतचा संसार मोडण्याचे कारणच जगजाहीर केले!

काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या तेजस्वी घोसाळकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दहिसर भागातील महिलांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेच्या या कार्यक्रमात आपल्याला तेजस्वी घोसाळकर यांच्या पाठीशी उभे राहायचे आहे, असे एक महिला सांगताना दिसत आहे. त्यावर टाळ्यांचा कडकडाट होताना दिसत आहे.

Pune BJP
NCP Politics : अजितदादा-अमोल कोल्हेंची दोन दिवसांची चर्चा निष्फळ : पुण्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही दोन्ही राष्ट्रवादीचे फिस्कटले

तेजस्वी घोसाळकर यांनी हा व्हिडीओ शेअर करुन 'दहिसर प्रभाग क्रमांक 2', असे लिहले आहे. त्यामुळे तेजस्वी घोसाळकर या दहिसरच्या प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपच्या उमेदवार असतील, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. तेजस्वी घोसाळकर यांचे सासरे विनोद घोसाळकर हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात.

Pune BJP
BJP Poltics : भाजपमध्ये बंडाची ठिणगी! उमेदवारी डावलल्याने माजी नगरसेविका धाडणार फडणवीसांसह चंद्रकांतदादांना रक्ताने लिहिलेलं पत्र

2017 मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत तेजस्वी घोसाळकर शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक 1 मधून विजयी झाल्या होत्या. त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हाच त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तेजस्वी घोसाळकर या त्यांचा प्रभाग क्रमांक 2 पिंजून काढत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये भाजपकडून अधिकृतरित्या त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

Pune BJP
Shivsena-NCP Yuti : सोलापुरात मोठी घडामोड; भाजपला शह देत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची युती

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com