MSC Bank Case : मोठी बातमी! शिखर बँक गैरव्यवहार आरोपांना पूर्णविराम; तपास बंद करण्यास न्यायालयाची मान्यता

Ajit Pawar MSC Bank Mumbai Court : दिवंगत अजित पवार, सुनेत्रा पवारांसह ७० हून अधिक जणांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची निषेध याचिका आणि ईडीची हस्तक्षेप याचिकाही फेटाळण्यात आली आहे.
Shikhar Bank scam
Shikhar Bank scamsarkarnama
Published on
Updated on

Mumbai Court : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) गैरव्यवहार प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा आर्थिक गुन्हे शाखेनं (EOW) दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयाने स्विकारला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ७० हून अधिक जणांना दिलासा मिळाला आहे.

या प्रकरणात कोणताही फौजदारी खटला तयार होत नसल्याचे विशेष न्यायालयाचे न्या. महेश जाधव यांनी शुक्रवारी अहवाल स्वीकारताना स्पष्ट केले.

'ईओडब्लूच्या या अहवालाविरोधात सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंसह तक्रारदार सुरिंदर अरोरा आणि साखर कारखान्यांशी संबंधितांनी या अहवालाच्या विरोधात हस्तक्षेप आणि निषेध याचिका केल्या होत्या. लिलाव प्रक्रियेतील अनियमितता तसेच, कारखाने ताब्यात घेतलेल्या कंपन्यांना सहकारी बँकांच्या प्रमुख पदांवर असलेल्यांशी जोडलेले व्यवहार आणि पुरावे याकडे 'ईओडब्लू'ने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यात केला होता.

दुसरीकडे, या प्रकरणाशी संबंधित 'ईडी'च्या प्रकरणात, अजित पवार आणि सुनेत्रा पवारांविरोधात आरोपपत्र केले नव्हते. मात्र, जुलै २०२५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांना आरोपी दाखवण्यात आले होते. पण याप्रकरणात ईडीची हस्तक्षेप याचिकाही फेटाळण्यात आली आहे.

Shikhar Bank scam
Latur ZP President : काँग्रेस सत्तेबाहेर, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपचा अध्यक्ष, लातूर झेडपीमध्ये सत्ता समीकरण जुळलं!

हा खटला सहकारी बँकांनी साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाशी संबंधित असून दिवंगत अजित पवार हे १९९५ पासून या बँकेच्या संचालकपदी होते. ईओडब्लू आणि ईडीच्या आरोपांनुसार, अनेक साखर कारखान्यांना हेतुतः आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य आणि नफ्यात नसलेली मालमत्ता म्हणून दाखवले आणि नंतर अजित पवारांसह बँक अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या मालकीच्या कंपन्यांना त्या मालमत्ता कमी किंमतीत विकल्या. खरेदीसाठीचा निधी जरंडेश्वर साखर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि जय अॅग्रोटेक या दोन कंपन्यांकडून आल्याचा आरोप होता. विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या २००८ पर्यंत जय अॅग्रोटेकच्या संचालकपदी होत्या.

Shikhar Bank scam
Pratibha Dhanorkar News: 'मला ‘व्हिलन’ ठरवले; डोके कुणाचे?'; खासदार धानोरकर सत्तास्थापनेतील षडयंत्राचा भांडाफोड करणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com