Pratibha Dhanorkar News: 'मला ‘व्हिलन’ ठरवले; डोके कुणाचे?'; खासदार धानोरकर सत्तास्थापनेतील षडयंत्राचा भांडाफोड करणार

Chandrapur Congress : बहुमताच्या जवळ असूनही काँग्रेसला चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यात अपयश आले. या संपूर्ण प्रकरणाचे खापर पद्धतशीरपणे माझ्यावर फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Congress leaders Vijay Wadettiwar and Pratibha Dhanorkar
Congress leaders Vijay Wadettiwar and Pratibha Dhanorkar Sarkarnama
Published on
Updated on

Chandrapur News: बहुमताच्या जवळ असूनही काँग्रेसला चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यात अपयश आले. या संपूर्ण प्रकरणाचे खापर पद्धतशीरपणे माझ्यावर फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र या षड्यंत्रामागे नेमके डोके कुणाचे आहे, याचा भांडाफोड लवकरच करणार, असा इशारा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला.

काँग्रेसच्या नवनिर्वाचित तसेच पराभूत उमेदवारांच्या स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन दोन दिवसांपूर्वी करण्यात आले होते. या स्नेहमिलन सोहळ्यात खासदार धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील मतभेद कायम असल्याचे दिसून आले. वडेट्टीवार समर्थकांनी या स्नेहमिलन सोहळ्याकडे पाठ फिरविली.

यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, सुभाष गौर, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा ॲड. कुंदा जेणेकर, काँग्रेस शहराध्यक्ष संतोष लहामंगे, जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक प्रदीप ऊर्फ पप्पू देशमुख, नगरसेवक वसंता देशमुख यांच्यासह धानोरकर समर्थक नगरसेवक उपस्थित होते.

महाराष्ट्रात पक्षाची स्थिती बिकट असताना चंद्रपूरच्या जनतेने काँग्रेसवर विश्वास दाखविला. मात्र सत्ता स्थापनेच्या वेळी काही ‘सेक्युलर’ म्हणवणाऱ्या पक्षांनी आणि आपल्या काही हितशत्रूंनी माझ्याविरोधात कट रचला. मला या प्रकरणात ‘व्हिलन’ ठरवण्यात आले. या प्रकरणातील सत्य लवकरच जनतेसमोर मांडणार, असे खासदार धानोरकर म्हणाल्या.

Congress leaders Vijay Wadettiwar and Pratibha Dhanorkar
Walmik Karad News: सुप्रीम कोर्टाचा वाल्मिक कराडला झटका, बापाचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर 24 तासांच्या आतच पोराची खळबळ उडवणारी पोस्ट

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी महापौर काँग्रेसचाच हवा; बहुमताचा आकडा नसेल तर विरोधात बसा, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. पक्ष वाढवण्यासाठी नेते प्रामाणिकपणे प्रयत्न करतात; मात्र त्यांच्या अवतीभवती असलेले काही स्वार्थी कार्यकर्ते स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्या नेत्यांविरोधात कानभरणी करून गटबाजी निर्माण करतात, हे दुर्दैवी आहे. अशा प्रवृत्तींमुळेच पक्षाच्या हक्काच्या संधी हुकतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली

Congress leaders Vijay Wadettiwar and Pratibha Dhanorkar
ST Bus: एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय यांनी केले. जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी खासदार धानोरकर यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वामुळेच नगरसेवकांची संख्या 12 वरून 27 पर्यंत वाढली, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे संचालन रामकृष्ण कोंड्रा यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com