Murlidhar Mohol : 'त्या' आंदोलकांना वेटर्स, सफाई कर्मचाऱ्यांनीच झोडपले! मोहोळ म्हणतात, जसे त्यांचे नेते राहुल गांधी तसे कार्यकर्ते...

Bharat Mandapam protest : भारत मंडपम येथील एआय समिटमध्ये युवक काँग्रेसच्या आंदोलनानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राहुल गांधींवर टीका केली. काँग्रेसची राजकीय संस्कृती नेत्यांच्या वर्तनातून दिसते, असा आरोप त्यांनी केला.
Security personnel intervene as Youth Congress workers protest during AI Impact Summit at Bharat Mandapam, drawing sharp reaction from Murlidhar Mohol.
Security personnel intervene as Youth Congress workers protest during AI Impact Summit at Bharat Mandapam, drawing sharp reaction from Murlidhar Mohol.Sarkarnama
Published on
Updated on

Congress Protest AI Summit Delhi : देशाच्या राजधानीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपम मध्ये सुरू असलेल्या जागतिक एआय इम्पॅक्ट समिटमध्ये भारतीय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अचानक आंदोलन केले. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. यानंतर राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चीब यांनाही अटक करण्यात आली आहे.

या सगळ्या घटनेनंतर पुण्यासह अनेक ठिकाणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत भाजप सरकारचा निषेध केल्याचे पाहायला मिळाले. यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पेटला असतानाच या घटनेबाबत भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाष्य केले आहे. या घटनेवर बोलताना त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे.

माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, एखाद्या राजकीय पक्षाची संस्कृती काय असते ही त्या पक्षाच्या नेत्याच्या वर्तनातून दिसत असते. राहुल गांधी जेव्हा जेव्हा विदेशात जातात तेव्हा तेव्हा ते आपल्या देशाचा आणि संविधानाचा अपमान करत असतात. जिथे त्यांना जाण्याची संधी मिळते तिथे ते आपल्या देशाबाबत वाईटच बोलून येतात.

त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आपण वेगळी अशी अपेक्षा करू शकत नाही. आज भारतामध्ये एआय समिटच्या निमित्ताने विविध देशातील प्रतिनिधी उपस्थित राहिले आहेत. एवढ्या मोठं आयोजन भारतात करण्यात आलं आहे ही देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

Security personnel intervene as Youth Congress workers protest during AI Impact Summit at Bharat Mandapam, drawing sharp reaction from Murlidhar Mohol.
AI Simmit protest row : तुम्ही आधीच नागडे! अखेर PM मोदीही तुटून पडले, 'त्या' कृतीबद्दल कट्टर विरोधकांचे मानले जाहीरपणे आभार

आणि अशा वेळेला या समिटच्या ठिकाणी विचित्र पद्धतीने येणं निदर्शन करणे चुकीचं होतं. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना सामान्य लोकांनीच चोप दिला आहे. इथे विरोध करणारी कोणतीही सरकारी यंत्रणा नव्हती तर त्या ठिकाणी काम करणारे वेटर्स आणि सफाई कर्मचाऱ्यांनीच त्या आंदोलनकर्त्यांना मारलं आहे.

Security personnel intervene as Youth Congress workers protest during AI Impact Summit at Bharat Mandapam, drawing sharp reaction from Murlidhar Mohol.
Maharashtra Police : ‘खाकी स्वॅग’च्या ट्रेंडविरोधात पोलिस दलाचा कठोर निर्णय, ‘रील्स’ आणि व्हिडिओंवर तात्काळ बंदी

यातून हे स्पष्ट दिसतं की या घटनेचा सर्व स्तरातून देशभरात निषेध करण्यात येत असून सामान्य लोकांमध्ये याबाबत चीड आहे. त्यामुळे ही सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांची कृती पाहिल्यानंतर जसा नेता तसेच कार्यकर्ते असंच म्हणणं योग्य ठरेल असं मुरलीधर मोहोळ यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com