Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सध्या सुरु आहे. महाविकास आघाडीच्या आतापर्यंत दोन ते तीन चर्चेच्या फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून जागावाटपाची चर्चा युद्धपातळीवर सुरु आहे. त्यातच आता महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली असून अद्याप काही जागांवर तिढा कायम आहे.
गेल्या काही दिवसापासून विधानसभा निवडणुकांसाठी जागा वाटपाची चर्चा सुरु असून मविआतील (MVA) घटकपक्षांशी वाटाघाटी सुरु आहेत. यावेळी विधानसभेचा मविआचा फॉर्म्यूला नक्की कसा असणार, हे ही त्यांनी सांगितले. त्यासोबतच अद्याप 20 ते 22 जागांचा तिढा कायम असल्याचे शिवसेना (Shivsena) उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले. (MVA News)
चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा प्रश्न सुटत आला आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात अजून 20 ते 22 जागांचा तिढा कायम आहे. या जागांसाठी तीन ही पक्षांत मोठी रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान, चर्चेनंतर मविआचा फॉर्म्यूला जवळपास निश्चित झाला आहे.
कसा असणार 'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्यूला?
महाविकास आघाडीत जागावाटप करीत असताना रणनिती कशी असणार हे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले आहे. सीटींग आमदार ज्यांचा ती जागा तो पक्ष लढवणार हा महाविकास आघाडीचा फॉर्म्यूला आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसापासून त्यानुसारच जागावाटप सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतमालाच्या दरावरून केली धूळफेक
दरम्यान, राज्यात सध्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, 45 मिलीमीटरच्या वर पाऊस झाल्यानंतर सरसकट मदत देणार असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. ही मदत शेतकऱ्यांना कधी देणार असा सवालही त्यांनी अंधारे यांनी केला. शेतमालाच्या दरावरून केंद्र आणि राज्य सरकारने धूळफेक केली असल्याचा आरोप त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.