

Nagar Urban Bank scam investigation update: नगर अर्बन बँकेतील बहुचर्चित आर्थिक घोटाळ्यात मोठी कारवाई करण्यात आली असून 28 संशयित आरोपींच्या तब्बल 72 मालमत्ता सरकारने जप्त केल्या आहेत.
येत्या दोन दिवसांत या सर्व मालमत्तांवर महाराष्ट्र शासनाच्या नाव नोंदवले जाणार आहे. या संदर्भात नगर तालुका, श्रीगोंदा, नेवासा, राहाता आणि पारनेर येथील तहसीलदारांना आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे संबंधित आरोपींच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
नगर अर्बन बँकेत तब्बल 291 कोटींचा घोटाळा झाला होता. या प्रकरणाची चौकशी नगर अर्बन बँकेचे माजी संचालक आणि बँक बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल केला होता. त्या आधारे तपास सुरू होता.
तपासादरम्यान बँकेत तब्बल 291 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले . ठेवीदारांच्या मागणीनुसार या प्रकरणात ठेवीदार संरक्षण कायदा लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत 10 संचालक, 4 अधिकारी आणि कर्जदारांसह एकूण 28 जणांवर कारवाई करत त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी सुधीर पाटील यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी संबंधित सर्व मालमत्तांच्या 7/12 उताऱ्यावर 'महाराष्ट्र शासन' अशी नोंद तात्काळ करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सुधारित 7/12 उतारे दोन दिवसांत सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.