Narayan Rane News : भाजपचे खासदार नारायण राणे यांनी हिंदू विरोधात गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधान भवनाकडे वळण्याआधीच कलम केले जातील, असे आपल्या ट्विट करत एमआयएमचे संभाजीनगर मध्यचे उमेदवार नासीर सिद्दीकी यांनी इशारा दिला आहे.
नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाच्या विरोधात वक्तव्यावर बोलताना संभाजीनगरमधील संभाजीनगर मध्यचे उमेदवार नासीर सिद्धीकी यांनी नितेश राणे यांना नाव न घेता मशिदमध्ये घुसून मारण्याची जे पाच फुटाचे धमकी देतात. त्यांना विधानसभेत घुसून मारण्याची ताकद मजलिसचे शेर ठेवतात, असे म्हटले होते.
नारायण राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आमदार नितेश राणे यांना विधानसभेत घुसून मारण्याची धमकी जाहीर भाषणातून दिली. हा तोच पक्ष आहे, ज्याच्या प्रमुखांनी एक एक मुसलमान वीस हिंदूंना भारी पडेल अशी दर्पोक्ती केली होती.
निजामशाहीच्या या पाठिराख्यांनी लक्षात ठेवावे देशात आता लांगुलचालन करणाऱ्यांचे सरकार नसून बहुसंख्यांचे हितरक्षण करणारे सरकार आहे. नितेश राणे व हिंदू विरोधात गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधान भवनाकडे वळण्याआधीच कलम केले जातील.
नासीर सिद्धीकी यांनी केलेल्या टीकेला नितेश राणे यांनी देखील तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आधी स्वस्थ झोप घेऊन दाखवावी.त्यांच्या स्वप्नात येऊन मारेन. लायकी आणि औकातीनुसार तोंड उघडायचे. आमच्याकडे वाकड्या नजरने पाहिलं तर दोन पायाने घरी जाणार नाही, असे चॅलेंज नितेश राणेंनी नासीर सिद्धीकी यांना दिले.
तिरंगी लढत
संभाजीनगर मध्य मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आमदार प्रदीप जैस्वाल यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून यांना बाळासाहेब थोरात यांना उमेदवार दिली आहे. तर एमआयएम यांच्याकडून नासीर सिद्धीकी मैदानात आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.