Narayan Rane : नारायण राणेंनी वाढवलं शिंदे गटाचं टेन्शन, केला 'हा' मोठा दावा

Narayan Rane On Lok Sabha Election 2024 : "मोदी की गॅरंटी आणि जनतेच्या विश्वासावर आम्ही 48 पैकी 48 जागा जिंकणार आहोत," असा विश्वास राणेंनी व्यक्त केला.
Narayan Rane
Narayan Ranesarkarnama
Published on
Updated on

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजप आमने-सामने आले आहेत. शिंदे गट आणि भाजपकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा सांगण्यात येत आहे. "रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर शिवसेनेचा दावा असून, १०० टक्के या जागेवर आमचा अधिकार आहे," असं विधान मंत्री उदय सामंत ( Uday Samant ) यांनी केलं होतं. अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठं विधान केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

Narayan Rane
BRS News : मराठवाड्यातच 'BRS'च्या ॲम्बेसिडरचं टायर पंक्चर होणार? गळतीला सुरुवात

नारायण राणे ( Narayan Rane ) म्हणाले, "रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर भाजपचा दावा आहे. तो दावा पर्मनंट असणार आहे. मी उमेदवार असेल का नाही वरिष्ठ ठरवतील. पण, कमळ निशाणीवरचा उमेदवार असेल नक्की. लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक नाही. उमेदवारीबाबत अगोदर बोलणं उचित नाही."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"देशवासीयांचा मूड मोदीच असणार आहे. मोदी की गॅरंटी आणि जनतेच्या विश्वासावर आम्ही 48 पैकी 48 जागा जिंकणार आहोत. रिफायनरी मी आणणार आहे. याबद्दल माझं संबंधित मंत्र्यांशी बोलणं सुरू आहे. रिफायनरीमुळे रत्नागिरीचा मोठा विकास होईल," असं नारायण राणेंनी सांगितलं.

Narayan Rane
Raj Thackeray : NDA तील सहभागाच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं मोजक्या शब्दांत उत्तर...

"मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रातील मराठ्यांची भूमिका काय हे मी ट्विट करून सांगितलं आहे. भाजपत कोणी येईल, त्याचं स्वागत करतो. आपल्या माणसांनी काँग्रेसमधून भाजपत यावं. पंतप्रधान मोदींच्या कामामुळे अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. लघू आणि सुक्ष्म खात्याचं कार्यालय रत्नागिरीत उभारणार आहे. यासाठी जागेची पाहणी करण्यासाठी सांगितली आहे," अशी माहिती राणेंनी दिली आहे.

R

Narayan Rane
Radhakrishna Vikhe Patil : काँग्रेसचे काही नेते रात्री...; विखे-पाटलांचा धक्कादायक आरोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com