Raj Thackeray : NDA तील सहभागाच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं मोजक्या शब्दांत उत्तर...

Raj Thackeray On Maratha Reservation : "फक्त झुलवलं आणि भुलवलं जातंय," असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.
Raj Thackeray Devendra Fadnavis Eknath Shinde
Raj Thackeray Devendra Fadnavis Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

भाजप नेते आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या 'शिवतीर्थ' या निवसस्थानी भेट घेतली. या वेळी दोघांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाल्याची माहिती आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन नेत्यांच्या भेटीमुळे महत्त्व प्राप्त झालं होतं. मनसेसुद्धा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत ( एनडीए ) सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ( Raj Thackeray On NDA Joining )

मनसेतील नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली होती. अशातच आशिष शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानं मनसे 'एनडीए'त सहभागी होणार का? अशी चर्चा रंगली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज ठाकरेंनी 'शिवतीर्थ' निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं तुम्ही 'एनडीए'त सहभागी होणार का? असा प्रश्न राज ठाकरेंना विचारला. त्यावर, "माझा विषय वेगळा आहे. जेव्हा निवडणुकीवर बोलायचं आहे, तेव्हा निवडणुकीवर बोलेन. आलात म्हणून प्रश्न विचारायचा नाही," असं म्हणत राज ठाकरेंनी पत्रकाराला खडसावलं.

Raj Thackeray Devendra Fadnavis Eknath Shinde
MP Sujay Vikhe : दोघेही महायुतीचे तरीही...; नीलेश लंके आयोजित कार्यक्रमावरून विखे म्हणाले...

मराठा आरक्षणासंदर्भात दोनदिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. याकडे लक्ष वेधलं असता, राज ठाकरे म्हणाले, "अधिवेशनानं काहीही होणार नाही. मराठा आरक्षण हा विषय राज्याचा नाही आहे. हा केंद्र आणि सर्वोच्च न्यायालयाचा विषय आहे. यातील काही तांत्रिक अडचणी सुटल्याशिवाय हा विषय पुढं जाणार नाही."

Raj Thackeray Devendra Fadnavis Eknath Shinde
MSC Bank Case : बँक घोटाळ्याप्रकरणी अजितदादांना दिलासा मिळणार का? हजारेंसह तक्रारदारांना नोटिसा

"फक्त झुलवलं आणि भुलवलं जातंय. यातून काहीही साध्य होणार नाही. हे होणार नाही म्हणून मी त्यांच्या ( मनोज जरांगे-पाटील ) समोर सांगितलं होतं," असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

R

Raj Thackeray Devendra Fadnavis Eknath Shinde
Loksabha Election 2024 : ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान; ठाण्यासह 18 लोकसभेच्या मतदारसंघांत निवडणूक लढविणार..!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com