Zirwal News : वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणानंतर मंत्री झिरवळ यांचा सुनेत्रा पवारांना फोन; आपला कुठलाही दोष नसल्याचं केलं स्पष्ट

Narhari Zirwal Controversial Video: एका तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्यानं अडचणीत आलेले मंत्री नरहरी झिरवळ यांनी पक्षप्रमुख सुनेत्रा पवार यांना फोन करुन घटनेची माहिती दिली.
Narhari Zirwal, Sunetra Pawar
Narhari Zirwal, Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : एका तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्यानं अडचणीत आलेले मंत्री नरहरी झिरवळ यांनी पक्ष प्रमुख सुनेत्रा पवार यांना फोन करुन या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. यामध्ये आपला काहीही दोष नसल्याचं त्यांनी अध्यक्षांना सांगितलं आहे. त्याचबरोबर याप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. त्यावर सुनेत्रा पवार यांनी नेमकी काय भूमिका घेतलीए जाणून घ्या.

Narhari Zirwal, Sunetra Pawar
Congress News : अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यानंतर तीन वर्षांनी नांदेडमध्ये पक्ष भाकरी फिरवणार!

झिरवळांनी नेमकं काय सांगितलं?

आज मंत्रीमंडळाच्या बैठकीला झिरवळ यांनी दांडी मारली, दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी झिरवळ यांचं म्हणणं ऐकून घेतलं. झिरवळ यांनी सांगितलं की, "माझी यात काहीही चूक नाही, या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे" असं झिरवळ यांनी म्हटलं आहे. यावर सुनेत्रा पवार यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली. झिरवळांना इतक्यात राजीना घेण्यात येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानं त्यांनी याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्लीला गेल्या असून भाजपच्या केंद्राय नेतृत्वाची ते भेट घेणार आहेत. राज्यातील एकूण राजकीय वर्तुळात काय काय चर्चा आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुनेत्रा पवार करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com