Accident Ozar devotees : नाशिकच्या भाविकांच्या बसला कानपूरला अपघात, खासदार भगरे मदतीला धावले; जखमींवर उपचार सुरू

Nashik Bus Accident News : नाशिकच्या ओझर येथील भाविकांच्या बसचा कानपूर येथे भीषण अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले असून खासदार भास्कर भगरे यांनी मदतीसाठी प्रशासनाशी संपर्क साधला.
Bhaskar Bhagre coordinates with authorities after a bus carrying devotees from Nashik met with a serious accident near Kanpur.
Bhaskar Bhagre coordinates with authorities after a bus carrying devotees from Nashik met with a serious accident near Kanpur.Sarkarnama
Published on
Updated on

Bhaskar Bhagre News : ओझर (नाशिक) येथील भाविक उत्तर भारतात देव दर्शनासाठी गेले होते. या भाविकांच्या बसचा कानपूर येथे भीषण अपघात झाला. त्यात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. कानपूर शहरातील महामार्गालगत उभ्या असलेल्या ट्रकला या बसची धडक झाली. हा अतिशय भीषण अपघात होता. त्यात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला.

या संदर्भात काही प्रवाशांनी व त्यांच्या नातेवाईकांनी खासदार भास्कर भगरे यांच्याशी संपर्क केला. खासदार भगरे यांनी तात्काळ कानपूर पोलीस आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून जखमींवर उपचारासाठी सूचना केल्या. खासदार भगरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी चर्चा करून जखमींना मदत व उपचार देण्यासाठी सूचना केल्या. त्यामुळे प्रशासन कार्यरत झाले.

ओझर येथील भाविक देवदर्शनासाठी जात असताना कानपूर येथील पुलावर त्यांच्या बसचा दुर्दैवी अपघात झाला. या घटनेची बातमी मिळताच परिसरात चिंता आणि हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात जखमी झालेल्या सर्व भाविकांना तात्काळ हायलाइट मेडिकल कॉलेज, कानपूर येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने सर्व जखमी भाविकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

ही माहिती मिळताच खासदार भास्करराव भगरे यांनी तात्काळ पुढाकार घेत नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली. तसेच कानपूरचे जिल्हा पोलीस प्रमुख एस.एम. कासीम आबेदी आणि उपजिल्हाधिकारी कानपूर यांच्याशीही संपर्क साधून जखमी भाविकांना आवश्यक ती सर्व मदत करण्याची विनंती केली.

कानपूर प्रशासनाने जखमी भाविकांच्या उपचारांची योग्य व्यवस्था, जेवणाची सोय आणि सुरक्षित परतीसाठी वाहन व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. या कठीण प्रसंगी प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा भाविकांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. सर्व जखमी भाविक लवकरात लवकर पूर्णपणे बरे होतील असा विश्वास खासदार भगरे यांनी व्यक्त केला.

Bhaskar Bhagre coordinates with authorities after a bus carrying devotees from Nashik met with a serious accident near Kanpur.
Nashik News : नाशिककरांनो, गॅस सिलेंडर मिळत नाही? अफवांवर विश्वास नको; पुरवठा अधिकाऱ्यांचे स्पष्ट आवाहन

भाविकांच्या कुटुंबीयांनी घाबरून जाऊ नये. या संदर्भात सर्व वैद्यकीय मदत आणि अन्य सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. आपण स्वतः प्रशासनाच्या संपर्कात आहोत. अपघातातील जखमींशी संपर्क केला असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत असे खासदार भास्कर भगरे यांनी सांगितले.

Bhaskar Bhagre coordinates with authorities after a bus carrying devotees from Nashik met with a serious accident near Kanpur.
Nashik News : नाशिकमध्ये औषध खरेदीत ४ कोटींच्या अनियमिततेचा आरोप, सभापतींचे जागेवरच चौकशीचे आदेश

एक प्रवासी ठार

भाविकांची ही बस कानपूर शहरातून जाताना रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका ट्रकवर आदळली. त्यामध्ये बसचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनाग्रस्त बसमधील प्रवाशांना पोलिसांनी बाहेर काढले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे, असे पश्चिम कानपूर विभागाचे उप आयुक्त एस. एम. कासिम अबिदी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com