

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होऊन 27 वर्षाचा कालावधी झाला आहे. त्यामध्ये 2014 ते 2019 हा भाजप सरकारच्या कालावधीत पाच वर्ष व एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर एक वर्ष असे सहा वर्ष वगळता 21 वर्ष अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिले आहे. त्यामध्ये सर्वाधिक दहा वेळा राज्याचा अर्थसंकल्प अजित पवार यांनी मांडला आहे. तर 1999 ते 2008 हे सलग नऊ वर्ष जयंत पाटील यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. मात्र, आता अजित पवार यांच्या निधनानंतर समीकरण बदलले आहे. भाजपने अर्थखाते त्यांच्याकडे ठेवले आहे. यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) स्थापना 10 जून 1999 झाली. त्यानंतर जवळपास गेल्या 27 पैकी 22 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. तर दुसरीकडे त्यापैकी एक वर्षाचा अपवाद वगळता 21 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्थमंत्री राहिला आहे. 1999 साली राज्यात राष्ट्र्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच काँग्रेससोबत आघाडी करून सत्तेत आली. त्यानंतर 1999 ते 2008 हे सलग नऊ वर्ष जयंत पाटील यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.
त्यानंतर 2008 ते 2009 हा एक वर्षासाठी दिलीप वळसे पाटील राज्याचे अर्थमंत्री राहिले. त्यांनी एक वर्ष अर्थसंकल्प सादर केला होता. तर 2009 ते 2010 मध्ये सुनील तटकरे हे अर्थमंत्री राहिले. त्यांनी एक वर्ष राज्याचा अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर 2010 ते 2014 मध्ये चार वर्ष अजितदादा अर्थमंत्री होते. त्यामुळे राज्यात 15 वर्ष जवळपास काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघडीचे सरकार असताना सलग 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात अर्थ खाते होते.
2014 ते 2019 मध्ये राज्यात भाजपची (BJP) सत्ता होती. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी पाच वर्ष अर्थसंकल्प मांडला. त्यानंतर 2019 साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत आले. यावेळी अजित पवार हे अर्थमंत्री झाले. 2019 ते 2022 सलग तीन वर्ष त्यांनी बजेट सादर केले. तर 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी एकवर्ष राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत नव्हती. त्यावेळी एकवर्ष देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर जुलै 2023 मध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली व महायुतीसोबत अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री झाले. 2024 व 2025 असे सलग दोन वर्ष त्यांनी बजेट सादर केले.
त्यामुळे आतापर्यांतचा इतिहास पाहता राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होऊन 27 वर्षाचा कालावधी झाला आहे. त्यापैकी भाजप सत्तेत असलेली पाच वर्ष व एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना एक वर्ष असे मिळून सहा वर्ष वगळता जवळपास 21 वर्ष अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिले आहे. बुधवारी अजित पवार यांचे बारामतीजवळील विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर सर्वच समीकरणे बदलली आहेत.
अजित पवार यांचे बुधवारी अपघाती निधन झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडीना वेग आला आहे. शनिवारी राज्याच्या पहिला महिला मुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. त्यांच्याकडे अजितदादांकडे असलेले अर्थखाते वगळता तीन खात्याचा पदभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे आता 27 वर्षाच्या इतिहासात तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादीकडून पहिल्यांदाच निसटल्या आहेत. 27 पैकी 21 वर्ष होते अर्थ खात्यावर राष्ट्रवादीचे साम्राज्य होते. मात्र, पहिल्यांदाच अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थखाते भाजपकडे गेले आहे.
अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम शेषराव वानखेडे यांच्या नावावर
अजित पवार यांनी 2025 चा अर्थसंकल्प मांडताना जयंत पाटील यांच्या 9 वेळा अर्थसंकल्प मांडण्याच्या विक्रमाचा उल्लेख करून त्यांचे कौतुकही केले होते. जयंत पाटील महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या नेत्यांमध्ये बॅ. शेषराव वानखेडे यांनी 13 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यानंतर अजित पवार यांनी 10 वेळा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यानंतर जयंत पाटील यांनी 9 वेळा तर सुशीलकुमार शिंदे यांनी 8 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.