Ajit Pawar Plane Crash : विमान अपघात : 'ब्लॅक बॉक्स सापडला, फडणवीस म्हणाले सर्व सत्य...

NCP Leader Amol Mitkari And Rupali Patil Thombare On Ajit Pawar Baramati Plane Crash : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघात निधन झाले. या घटनेनंतर राष्ट्रवादीतील नेतेच आता संशय व्यक्त करताना दिसत आहेत.
Ajit Pawar Death News in Marathi
Ajit Pawar Death News in MarathiSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली सुरू झाल्या.

  2. दुःखवटा संपण्याआधीच सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.

  3. अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे पाटील यांनी मृत्यू अपघात नसून घातपात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Pune News : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर राज्यात जोरदार हालचाली झाल्या. राज्यातील दु:खवटा संपण्याच्या आधीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि वरिष्ठांसह आमदारांनी खासदार सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदावर बसवले. यामुळे अजितदादांनंतर त्यांची जागा कोण घेणार हा प्रश्न मार्गी लागला आहे. पण नव्याने गंभीर प्रश्न आणि अजितदादांच्या मृत्यूवर सवाल उपस्थित केले जाऊ लागले आहेत. राज्यातील विरोधकांसह राष्ट्रवादीतील नेतेच आता अजित पवारांचा मृत्यू घात होता की घातपात? असा प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. यावरून राज्यात खळबळ उडाली आहे. तर या प्रश्नांची उत्तरे सरकार आणि यंत्रणांनी द्यावीत अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

अजितदादांच्या विमान अपघातानंतर विरोधकांसह काही नेत्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. ज्यानंतर वाद सुरू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा हा वाद नव्याने सुरू झाला असून राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी अजितदादांच्या मृत्यूनंतर डीजीसीएने सहा लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली, पण प्रत्यक्षात पाच मृतदेहच का सापडले.

एक मृतदेह कुठे गेला? जर अजितदादांची ओखळ घड्याळावरून पटली असेल तर ते घड्याळ कुठे आहे? विमान आणि विमान चालक यांचा इतिहास समोर असतानाही ते का देण्यात आले. ते विमान चालक का पाठवण्यात आले, असे प्रश्न विचारले आहेत. तर एका नेत्यांने अजित पवारांचा मृत्यू घात होता की घातपात? असा प्रश्न उपस्थित करत राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली.

Ajit Pawar Death News in Marathi
Ajit Pawar Plane Crash : बारामती विमानतळ असुरक्षितच; शून्य उपाययोजना : 10 वर्षांत 9 अपघात

त्यांनी विमान अपघात झाला त्यावेळी विमानातील सगळेच जळले मात्र कागदपत्रं तशीच राहिली, ऐनवेळी दोन्ही पायलट का बदलले? याची चौकशी करा अशीही मागणी केली आहे. ज्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समोर येवून माहिती दिली आहे.

त्यांनी या प्रकरणाची सध्या डीजी इन्वेस्टीगेशन सुरू असून आता ब्लॅक बॉक्सही सापडलेला आहे. त्याच्यामुळे त्यातलं सगळं सत्य बाहेर येईल. ब्लॅक बॉक्समध्ये सगळं कम्युनिकेशन पूर्ण स्टोअर झालं आहे. तसेच पायलट यांच्यातील इंटरनल कम्युनिकेशनही स्टोअर होतं तेही मिळालं आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टींची ज्यावेळेस पडताळणी होईल ते सगळं सत्य बाहेर येईल असेही फडणवीस यांनी सांगितलं आहे.

दरम्यान बारामतीतील विमान अपघातप्रकरणी तपास सुरू असून फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या पथकाकडून विमानाचे तुकडे काळजीपूर्वक उचलले जात आहेत. हे अवशेष पुढील तपासासाठी मुंबईला पाठवले जाणार असून विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला, तांत्रिक बिघाड होता की इतर काही कारण, याचा तपास यंत्रणांकडून केला जाणार आहे. तर लवकरच अहवाल येण्याची शक्यता आहे.

FAQs:

1. अजित पवार यांचा मृत्यू कसा झाला?
अजित पवार यांचा मृत्यू विमान अपघातात झाल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र आता त्यावर संशय व्यक्त केला जात आहे.

2. सुनेत्रा पवार यांची नियुक्ती कधी झाली?
दुःखवटा संपण्याआधीच राष्ट्रवादीने त्यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली.

3. अजित पवारांच्या मृत्यूवर प्रश्न कोणी उपस्थित केले?
आमदार अमोल मिटकरी आणि नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

4. हा मृत्यू अपघात की घातपात असा वाद का आहे?
घटनाक्रम आणि राजकीय घडामोडी पाहता अनेक नेत्यांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे.

5. या प्रकरणाची चौकशी होणार का?
नेत्यांनी सरकार आणि तपास यंत्रणांकडे चौकशीची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com