Solapur BJP : महापौरपदाच्या ‘रेस’मधील नरेंद्र काळेंची भाजपकडून गटनेतेपदी बोळवण....

Municipal Corporation Politic's : सोलापूर महापालिकेत भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची गटनेतेपदी निवड झाल्याने महापौरपदाची शर्यत अधिक रंगली आहे आणि पुढील महापौर कोण होणार याकडे शहराचे राजकीय सर्वांचे सध्या खास लक्ष लागले आहे.
Narendra Kale
Narendra KaleSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 31 January : सोलापूर महापालिकेत भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची निवड करण्यात आली आहे, त्यामुळे सोलापूरचा महापौर कोण होणार, याची उत्सुकता वाढली आहे. काळे यांचेही नाव महापौरपदासाठी चर्चेत होते. मात्र, आता त्यांची गटनेता म्हणून बोळवण करण्यात आल्याचे मानले जात आहे. आता सोलापूरच्या महापौरपदी कोणाला संधी दिली जाते, याकडे सोलापूर शहराचे लक्ष लागले आहे.

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) ऐतिहासिक कामगिरी नोंदवत 102 पैकी 87 नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपने निवडणुकीत केलेल्या या कामगिरीमुळे सोलापूर शहराचा महापौर, गटनेता, स्थायी समिती सभापती, सभागृह नेता या पदांवर कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता होती.

सोलापूर महापालिकेतील भाजपचे 87 नगरसेवक गटनोंदणीसाठी आज पुण्यात विभागीय कार्यालयात गेले होते. भाजप नगरसेवकांच्या गटाची नोंदणी केल्यानंतर त्याठिकाणीच महापालिकेतील गटनेतेपदी नरेंद्र काळे (Narendra Kale) यांची नियुक्ती करण्यात आली. तशी नोंदणीही करण्यात आली आहे.

Narendra Kale
NCP SP MLA Upsate : शपथविधीबाबत पवारांचा आमदार नाराज; म्हणाले, पवारसाहेबांना डावलून निर्णय...’

सोलापूरच्या महापौरांची येत्या 6 फेब्रुवारीला निवड करण्यात येणार आहे. महापौरपदासाठी नरेंद्र काळे, डॉ. किरण देशमुख, अनंत जाधव, विनायक कोंड्याल हे प्रमुख नगरसेवक चर्चेत होते. त्यातील नरेंद्र काळे यांची गटनेतेपदी आज पुण्यात निवड करण्यात आली आहे, त्यामुळे काळे यांच्या महापौरपदाचे काय, अशी चर्चा होत आहे.

Narendra Kale
NCP Politics : शरद पवारांच्या भेटीसाठी पार्थ पवार थेट गोविंदबागेत; दोन्ही राष्ट्रवादीची एकत्र येण्याची शक्यता पुन्हा बळावली?

नरेंद्र काळे हे सोलापूर महापालिकेत तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. यापूर्वी त्यांनी महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले आहे. तसेच काळे यांनी भापजचे शहराध्यक्षपदही भूषविले आहे. त्यामुळे नरेंद्र काळे यांना या वेळी महापौरपदाची संधी मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, त्यांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.