NCP merger talks : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग; दिल्लीत सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या महत्त्वाच्या बैठका

Supriya Sule Praful Patel meeting News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत विलीनीकरणाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
sunil tatkare, parful patel, supriya sule
sunil tatkare, parful patel, supriya sule Sarkarnama
Published on: 
Updated on: 

New dehli News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे विलीनीकरण लवकरच होणार असल्याच्या चर्चाना वेग आला आहे. त्यातच आता मुंबईनंतर दिल्लीत देखील वेगवान घडामोडी घडत आहेत. शुक्रवारी सकाळी पुण्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांची बैठक पार पडली. त्यानंतर दिल्लीतही दिवसभर बैठकांमुळे घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांची महत्त्वाची बैठक पार पडली आहे, दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 35 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती सूत्रांने दिली.

नवी दिल्लीत संसदेच्या परिसरात खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी सुमारे 35 मिनिटे चर्चा झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांने दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत विलीनीकरणाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे या बैठकीला 'विलीनीकरणाची लंच डिप्लोमसी' असे संबोधले जात आहे.

शुक्रवारी दुपारी झालेल्या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांचीही स्वतंत्र भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) विलीनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

sunil tatkare, parful patel, supriya sule
NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनील तटकरेंना खलनायक ठरवू नका! अदिती तटकरे यांची टीकाकारांना चपराक

दिल्लीत सुरू असलेल्या या नेतेमंडळीच्या बैठकांमुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या चर्चेला महत्त्वा प्राप्त झाले आहे.

sunil tatkare, parful patel, supriya sule
NCP Mla Meeting : पार्थ पवार-सुनेत्रा पवारांसोबत बैठक, आमदार मांडेकर, माऊली कटकेंनी बाहेर येताच कारण सांगितलं, 'विलीनीकरणावर चर्चा....'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.