NCP Mla Meeting : पार्थ पवार-सुनेत्रा पवारांसोबत बैठक, आमदार मांडेकर, माऊली कटकेंनी बाहेर येताच कारण सांगितलं, 'विलीनीकरणावर चर्चा....'

Sunetra Pawar Shankar Mandekar Mauli Katke : ही बैठक नियोजित नव्हती.वहिनी इकडे असल्याचे कळल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी आलो, असे आमदार माऊली कटके यांनी सांगितले.
Sunetra Pawar Parth Pawar.jpg
Sunetra Pawar Parth Pawar.jpgSarkarnama
Published on: 
Updated on: 

NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाविषयी चर्चा सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील आमदारांनी आज जिजाई बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांची भेट घेतली. पार्थ पवारांनी आमदारांची बैठक बोलवली होती, अशी चर्चा होती.

दरम्यान, या बैठकीतून बाहेर आल्यानंतर मुळशीचे आमदार शंकर मांडेकर आणि शिरुरचे आमदार माऊली कटके यांनी माध्यमांशी संवाद साधला. बैठक नेमकी कोणत्या कारणाने होती हे त्यांनी सांगितले.

आमदार मांडेकर म्हणाले की, बैठकीत विलीनीकरणाविषयी कोणतीही चर्चा झाली नाही. मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांबाबत आणि निधीबाबत या बैठकीत चर्चा झाली. विलीकरणाबाबत त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, पवार कुटुंब आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते जो काही निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल.

Sunetra Pawar Parth Pawar.jpg
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे 20 आमदार फुटणार? सुनील तटकरेंनी एका वाक्यात विषय संपवला; म्हणाले, 'आमचा पक्ष …'

एकही आमदार कुठे जाणार...

आमदार माऊली कटके यांनी सांगितले की, ही बैठक नियोजित नव्हती.वहिनी इकडे असल्याचे कळल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी आलो. त्यांनी आमच्याशी चर्चा करत दुष्काळच्या परिस्थिती आढावा घेतला. विलीनीकरणाबाबत काहीही चर्चा झाली नाही. तसेच राष्ट्रवादीचे आमदार फुटणार असल्याच्या संजय राऊतांच्या दाव्यावर ते म्हणाले की, एकही आमदार इकडे तिकडे जाणार नाही.

विलीनीकरणाचा प्रस्ताव नाही

दोन्ही राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आज राजधानी दिल्लीत आहेत.यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. त्या म्हणाल्या की, विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव त्यांच्यासमोर नाही. माझा भाऊ गेला, त्याच दिवशी माझ्यासाठी विलीनीकरणाचा विषय संपला.

Sunetra Pawar Parth Pawar.jpg
NCP Politics : राष्ट्रवादीच्या आमदारांना धडाधड फोन, पार्थ पवारांनी घेतली बैठक, मोठं काय तरी घडणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.