Tiger Shroff car firing : टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारक घटनाक्रम

Eyewitness Salma Shaikh recounts the firing incident involving Tiger Shroff's car in Mumbai, in which the driver was reportedly injured : फुटबॉल सामना संपल्यानंतर टायगर श्रॉफ घराकडे निघाले असताना गोळीबार; सुरुवातीला फटाके फुटल्याचा भास, चालक जखमी झाल्याची प्रत्यक्षदर्शी सलमा शेख यांची माहिती.
Tiger Shroff car firing
Tiger Shroff car firingSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai firing incident : अभिनेता टायगर श्राॅफ यांच्या कारवर झालेल्या गोळीबाराचा घटनाक्रम प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सलमा शेख यांनी सांगितले. टायगर यांची कार मुख्य रस्त्यावर पोहोचताच, एका युवकाने समोर येत गोळीबार करण्यास सुरूवात केली.

सर्वांना वाटले की, दिवाळीची फटाके फुटत आहे. मात्र कार थांबली अन् टायगर श्राॅफ त्यातून खाली पडले. पण त्यांना काहीही दुखापत झाली नव्हती, असे सलमा शेख यांनी सांगितले.

सलमा शेख ब्लाॅगर आहेत. त्या मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी फिरून व्हिडिओ कंटेंटवर काम करतात. टायगर श्राॅफ यांच्या कारवर झालेल्या गोळीबारावेळी (Crime) त्या तिथेच उपस्थित होत्या. त्यांनी गोळीबाराचा थरारक घटनाक्रम सांगितला.

रविवारी सलमा शेख यांचे अमिताभ बच्चन (Actors), त्यानंतर टायगर श्रॉफ आणि मग अभिषेक बच्चन यांच्या शूटिंगचे नियोजन होते. फुटबॉलचा सामना संपल्यानंतर, टायगर श्राॅफ यांचे सर्वजण शूटिंग करू लागले. सलमा शेख यांनी कारमध्ये बसत असताना टायगर श्राॅफ यांना आवाज दिला. त्यानंतर ते कारमध्ये बसला आणि तिथून निघून जाऊ लागला.

Tiger Shroff car firing
Tiger Shroff car firing case : टायगर श्रॉफच्या कारवर सात गोळ्या झाडल्या; एकाला अटक, जुहू गोळीबार प्रकरणात तपासाला वेग

टायगर श्राॅफ यांची गाडी मुख्य रस्त्यावर पोहोचताच एका युवकाने त्यांच्या कारवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला सर्वांना वाटले की, दिवाळीचे फटाके फुटत असल्याचा भास झाला. मात्र, त्यानंतर कार थांबली आणि टायगर खाली पडला. सुदैवाने, त्यांना काहीही खरचटलंही नव्हते.

Tiger Shroff car firing
Radhakrishna Vikhe Patil : जंतर-मंतरवरील आंदोलनाला परदेशी निधी? विखे पाटलांचा सवाल; माध्यमांना केले आवाहन

मात्र, त्यांच्या चालकाला गोळी लागली होती. चालकाच्या हाताच्या कोपराला गोळी लागली होती, तर दुसरी गोळी त्याच्या तळहातातून आरपार गेली होती. त्यानंतर त्यांना तातडीने पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तिथून पुढे त्यांना नानावटी रुग्णालयात आणण्यात आले.

टायगर श्राफ यांचे कुटुंब जमले होते. ते सर्वजण तेथून निघून गेले. मात्र, जखमी चालक अद्याप रुग्णालयातच आहे. टायगर श्राॅफ यांचा फुटबॉलचा सामना साधारणपणे सायंकाळी सात वाजता संपला होता. त्यानंतर ते सात वाजून पाच मिनिटांनी बाहेर येत घराकडे जाण्यासाठी रवाना झाले होते, असे सलमा शेख यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com