

National Testing Agency news : नीट पेपरफुटीप्रकरणात राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या तक्रार निवारण केंद्रावर तक्रारींचा पाऊस पडत आहे.
यातच भाजपचे विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) बरखास्त करण्याची मागणी करत खळबळ उडवून दिली. परीक्षा पद्धत बदलून, ऑनलाईनपद्धतीने परीक्षा घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले, "नीट पेपरफुटीमध्ये मोठी साखळी असून सरकारने, राष्ट्रीय परीक्षा संस्था बरखास्त करावी. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे देशभरातील लाखो होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांचं (Student) मोठं नुकसान झालं आहे." या प्रकरणात केवळ छोट्या आरोपींना नव्हे, तर मूळ सूत्रधारांना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच भविष्यात पेपर फुटी टाळण्यासाठी परीक्षेची पद्धत बदलली पाहिजे. नीटची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने झाली पाहिजे, अशी देखील मागणी आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली.
सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या बरखास्तीची मागणी करत असतानाच, तिकडे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेपर फुटीची माहिती सांगताना, राष्ट्रीय परीक्षा संस्थेची यंत्रणा किती गाफिल आहे, याला अप्रत्यक्षरीत्या दुजोरा दिला.
राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या तक्रार निवारण यंत्रणेवर पेपर फुटीबाबत तक्रार करत होते. पुढे या तक्रारींमध्ये वाढ झाली. समाज माध्यमांवर व्हायरल झालेला नीटचा पेपर गेस पेपरशी जुळत होता, अशा तक्रारी होत्या. या तक्रारींमधून घोटाळ्याचा धागा उलगडल्याचा माहितीला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दुजोरा दिला.
धर्मेंद्र प्रधान यांनी नीट पेपरफुटीची माहिती देताना, राष्ट्रीय परीक्षा संस्था गाफिल असल्यावर शिक्कामोर्तब होतो किंवा, परीक्षेबाबत यंत्रणेला गांभीर्य नाही, असे तरी दिसते. यातच भाजपचे महाराष्ट्र विधान परिषदेतील आमदार सदाभाऊ खाते यांनी राष्ट्रीय परीक्षा संस्था बरखास्त करण्याची मागणी केली आहे.
सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रीय परीक्षा संस्था बरखास्तीच्या मागणीचे साधलेल्या टायमिंगमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. केंद्रातील भाजप सरकार, केंद्रीय शिक्षण मंत्री, नेते आणि प्रशासकीय पातळीवरील अधिकारी या मागणीकडे कोणत्या नजरेतून पाहातात, याकडे आता लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.