

एनआयएने एल्गार परिषद आणि शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी वरवरा राव आणि सुधा भारद्वाज यांचा जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे.
जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा करत एनआयएने मुंबईतील विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला.
न्यायालयाने या अर्जाची दखल घेत दोन्ही आरोपींना उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
Varavara Rao and Sudha Bharadwaj Bail Case : एल्गार परिषद आणि शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी तेलुगु कवी वरवरा राव आणि वकील सुधा भारद्वाज यांनी जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा करून त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी (ता. १५) मुंबईतील विशेष न्यायालयात केला आहे.
यानंतर आता विशेष न्यायालयाने एनआयएच्या या अर्जाची दखल घेऊन राव आणि भारद्वाज यांना उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. राव आणि भारद्वाज हे दोघेही यावर्षी १९ जानेवारीला ‘मुंबई प्रेस क्लब’ येथे आयोजित कार्यक्रमात प्रकरणातील इतर सह-आरोपींसह उपस्थित होते. त्यामुळे राव आणि भारद्वाज यांनी न्यायालयाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा करून एनआयएने जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे.
कार्यक्रमानंतर दोन दिवसांनी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी मुंबई प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्याच वेळी क्लबनेही अंतर्गत चौकशी समितीच्या अहवालानंतर आपल्या तीन सदस्यांचे निलंबन केले होते.
कनिष्ठ न्यायालयाने ७ मे रोजी या तीन सदस्यांपैकी एक गुरबीर सिंग यांच्या हकालपट्टीला स्थगिती दिली. ही कारवाई केवळ त्यांना क्लबची निवडणूक लढवण्यापासून रोखण्याच्या उद्देशाने केल्याचे मत नोंदवून न्यायालयाने सिंग यांना निवडणूक लढवण्याची परवानगीही दिली होती.
कार्यक्रमात पुढील वाटचालीवर चर्चा
प्रेस क्लब येथील कार्यक्रमाचा उद्देश, सीपीआय (माओवादी)ची विचारसरणी आणि शहरी नक्षल चळवळीच्या पुढील वाटचालीवर चर्चा करणे असल्याचा दावा एनआयएने आपल्या अर्जात केला आहे. जामीन रद्द करण्याची मागणी करणाऱ्या आपल्या अर्जासह एनआयएने ‘मुंबई प्रेस क्लब’च्या चौकशी समितीच्या अहवालाची प्रत आणि सदर कार्यक्रमाचे सीसीटीव्ही चित्रीकरणही जोडले आहे. आरोपींच्या सीडीआरचाही संदर्भ दिला आहे.
वरवरा राव आणि सुधा भारद्वाज यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला आहे.
एल्गार परिषद आणि शहरी नक्षलवाद प्रकरणाशी संबंधित आहे.
जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा एनआयएने केला आहे.
मुंबईतील विशेष न्यायालयात या अर्जाची सुनावणी झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.