'मुंबई महापालिका लुटली? राजकीय धर्मांतरही केलं!', उद्धव ठाकरेंवर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली

Nitesh Rane attacks On Uddhav Thackeray : राज्यात सध्या मतचोरी प्रकरण चांगलेच तापले असतानाच ठाकरे बंधुंमधील दुरावाही कमी होताना दिसत आहे. अशातच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना गणेशोत्सवासाठी दिलेल्या आमंत्रणावरूनही विविध प्रतिक्रिया येत आहेत.
Raj Thackeray And Uddhav Thackeray
Raj Thackeray And Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. भाजप मंत्री नितेश राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करत राजकीय धर्मांतर झाल्याचा आरोप केला.

  2. राणेंनी उद्धव ठाकरेंवर मुंबई महापालिका लुटल्याचा गंभीर आरोप लावला.

  3. या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून राज ठाकरे यांच्याबद्दलही भाष्य झाले आहे.

Mumbai News : भाजप मंत्री नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांचं राजकीय धर्मांतर झालं आहे, अशी खोचक टीका नितेश राणेंनी केली असून त्यांनी, ठाकरेंनी मुंबई महापालिका लुटली असाही आरोप केला आहे. तसेच राणेंनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबतही भाष्य केल्याने राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे.

राज्यभर आता गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू असून चाकरमानेही कोकणात निघाले आहेत. अशातच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना गणेशोत्सवासाठी आमंत्रण दिले आहे. यावरून भाजपकडून तिखट प्रतिक्रिया येताना दिसत आहे. याच आमंत्रणावरून नितेश राणे यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे. त्यांनी, ‘कोणाला बोलवावं किंवा नाही बोलावावं हा त्यांचा घरातला विषय आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना बोलावलं चांगली गोष्ट आहे. राज ठाकरे देवेंद्र फडणीसांपासून सगळ्यांकडे जातात. यालाच महाराष्ट्राची संस्कृती म्हणतात. आम्ही सगळेच एकमेकांसोबत नातेसंबंध ठेवून आहोत. दोन भाऊ वाद मिटून एकमेकांच्या घरात जात असतील तर काही वाद नाही.

Raj Thackeray And Uddhav Thackeray
Nitesh Rane : नितेश राणेंनी मटका बुकीवर धाड टाकलीच, पोलीसांवरही भडकले; म्हणाले, 'पदभार घेताच इशारा दिला होता, आता...'

मात्र उद्धव ठाकरे यांचे राजकीय धर्मांतर झालं आहे, तरी त्यांना राज ठाकरे यांच घरी गणपतीसाठी जाण्यासाठी संधी मिळत असेल तर ही चांगली बाब असल्याची खोचक टीका नितेश राणे यांनी केली आहे. तसेच त्यांनी यावेळी ठाकरेंवर गंभीर आरोप करताना, ‘मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यापेक्षा मातोश्रीवर काढावा, त्यांची मर्सडीज, त्यांचे कपडे, एसी हे पालिकेच्या पैशाच्या माध्यमातून ठाकरेंनी घेतले आहे. ज्या पद्धतीने मुघलांनी भारत लुटला. कटकारस्थान रचले. तसेच ठाकरेंनी पालिका लुटण्यासाठी कटकारस्थान रचले. मुंबई महापालिका लुटल्याचा दावा देखील नितेश राणेंनी यावेळी केला आहे.

यावेळी नितेश राणे यांनी मतचोरीवर बोलताना, आम्ही मोदी एक्सप्रेसमध्ये आज मतांची चोरी केली असून आमच्यासाठी मतांची चोरी म्हणजे लोकांची कामे करणे, त्यांची मने जिंकणे. आज कोकणात आमची लोकं मोदी एक्सप्रेसने फ्रीमध्ये गेला. आम्ही कामं केल्याने लोकांची मने अशा पद्धतीने जिंकल्याने कोकणात जाणारा प्रत्येक व्यक्तिचा मानस हा भाजपला मतदान करण्याचा आहे. त्यामुळे घरात बसून ओरडायची गरज लागत नाही, असंही राणे यांनी म्हटलं आहे.

Raj Thackeray And Uddhav Thackeray
Nitesh Rane: 'वराह भगवान' जयंती राज्यभरात साजरी व्हावी! शाळांमध्ये व्याख्यानं आयोजित करा; नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

FAQs :

प्रश्न 1: नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर काय आरोप केले?
उत्तर: त्यांनी उद्धव ठाकरेंचं राजकीय धर्मांतर झालं असल्याचं सांगितलं आणि मुंबई महापालिका लुटल्याचा आरोप केला.

प्रश्न 2: नितेश राणेंनी आणखी कोणाबद्दल भाष्य केलं?
उत्तर: त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांबद्दल भाष्य केलं.

प्रश्न 3: या वक्तव्यामुळे काय परिणाम झाला?
उत्तर: महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून वाद अधिक तीव्र झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com