Nitin Gadkari : नितीन गडकरींची एकनाथ शिंदेंच्या आमदाराला तंबी, म्हणाले, 'सुधारणार...'

Nitin Gadkari Narendra Bhondekar noorul hasan : कार्यक्रमात भंडाऱ्याचे एसपी नुरुल हसन यांनी गडकरी यांना सॅल्यूट करत 'जय हिंद सर' असे म्हटले. गडकरी यांनी देखील हसन यांना नमस्ते म्हणत उत्तर दिले
Nitin Gadkari
Nitin Gadkari sarkarnama
Published on
Updated on

Nitin Gadkari News : केंद्रीय नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वीच हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या मंत्र्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. अधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीमुळे गडकरी संतप्त झाले होते. त्यानंतर भंडाऱ्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी एकनाथ शिंदेंच्या आमदाराला तंबी दिली. मात्र ही तंबी रागाने नव्हे तर हसत हसत दिली.

भंडाऱ्यातील एका कार्यक्रमात मंत्री गडकरी, आमदार नरेंद्र भोडंकर आणि भंडाऱ्याचे पोलिस अधिक्षक नुरुल हसन हे एकत्रित भेटले. त्यावेळी 'पोलिस अधीक्षकांना टिकवा, नाहीतर मी तुम्हाला सुधारणार', अशी तंबी हसत हसत गडकरी यांनी एकनाथ शिंदेंचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना दिली.

कार्यक्रमात भंडाऱ्याचे एसपी नुरुल हसन यांनी गडकरी यांना सॅल्यूट करत 'जय हिंद सर' असे म्हटले. गडकरी यांनी देखील हसन यांना नमस्ते म्हणत उत्तर दिले. गडकरी म्हणाले, नुरुल हसन हे चांगले अधिकारी आहेत. त्यावर आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले, आम्ही त्यांना सांभाळत आहोत आणि सोबत आहोत. भोंडेकरांच्या प्रत्युत्तरानंतर नितीन गडकरींनी हसत हसत तंबी दिली. 'तुम्ही जर एसपींना सांभाळलं नाही तर आम्ही तुम्हाला सुधारू. कडक शिस्तीचा अधिकारी नसला तर, आमदारही सुधारणार नाहीत.' तसेच पोलिस अधिक्षकांना टिकवले नाही तर आम्ही तुम्हाला सुधारून टाकू', असे देखील गडकरी यांनी म्हटले.

Nitin Gadkari
Thackeray Brand : "ब्रँड असता तर..."; शिंदेंच्या आमदाराने थेट बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत 'ठाकरे ब्रँड'वर उपस्थित केली शंका

भंडारा दौऱ्यात नितीन गडकीर यांच्या हस्ते 84 हजार रुपये किंमतीच्या मौदा-वाय जंक्शन 6 लेन उड्डानपूलाचे लोकर्पण करण्यात आले. तसेच 735 कोटी रुपये किंमतीच्या भंडारा बायपासचे लोकर्पण देखील त्यांनी केले. तसेच भंडार येथे 1100 कोटींच्या पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकर्पण व भूमिपूजन देखील नितीन गडकीर यांच्या हस्ते करण्यात आले.

Nitin Gadkari
Shivsena UBT : पक्षाची वाताहत झाली तरी चालेल... पण आम्ही एकत्र येणार नाहीच; ठाकरेंच्या प्रमुख दोन शिलेदारांची तोंडं वेगवेगळ्या दिशेला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com