NEET Exam Controversy : पेपरफुटीनंतर NTA चा नवा प्रताप; अजब कारभाराची मालिका सुरूच! विद्यार्थी नागपूरचा, अन् परीक्षा केंद्र थेट अबुधाबीत

NTA latest controversy after paper leak : पेपरफुटी प्रकरणानंतर NTA पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नागपूरच्या एका विद्यार्थ्याला थेट अबुधाबीमध्ये परीक्षा केंद्र देण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
NEET Exam
NEET ExamSarkarnama
Published on
Updated on

नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या वादानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) पुन्हा एकदा आपल्या कारभारामुळे चर्चेत आली आहे. यावेळी नागपूरमधील एका विद्यार्थ्याला फेरपरीक्षेसाठी थेट परदेशातील परीक्षा केंद्र देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 21 जून रोजी होणाऱ्या नीट फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्याच्या प्रवेशपत्रावर संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबी हे केंद्र हॉल तिकिटवर छापून आले आहे.

संबंधित विद्यार्थी अब्दुल्लाह याने मूळ अर्ज भरताना नागपूर, वर्धा आणि भंडारा या शहरांतील परीक्षा केंद्रांना प्राधान्य दिले होते. यापूर्वी त्याला नागपूरमध्येच परीक्षा केंद्र मिळाले होते. मात्र फेरपरीक्षेच्या प्रवेशपत्रात अचानक अबुधाबी केंद्राचा उल्लेख झाल्याने विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

NEET Exam
Pavanraje Nimbalkar murder case : पवनराजे निंबाळकर हत्याकांड: 20 वर्षांनंतर अंतिम निकाल लागणार; माजी गृहमंत्र्यांसह 9 आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश!

या गोंधळामुळे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पेपरफुटीच्या प्रकरणानंतर परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकतेचे आश्वासन देणाऱ्या एनटीएच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

घटनेनंतर पालकांनी एनटीएच्या हेल्पलाइनवर संपर्क साधून तक्रार नोंदवली. प्राथमिक चौकशीत तांत्रिक त्रुटीमुळे हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सुधारित प्रवेशपत्र देण्यात येईल, असे आश्वासन संस्थेकडून देण्यात आले आहे.

NEET Exam
Amit Shah : कोल्हापुरात यंत्रणा 'टाईट'! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, करवीरनगरीला छावणीचे स्वरूप

दरम्यान, माजी शिक्षणमंत्री डॉ. अनीस अहमद यांनी या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया देत विद्यार्थ्याला तातडीने स्थानिक परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे एनटीएच्या परीक्षा व्यवस्थापनावरील टीका आणखी तीव्र झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com