Operation Tiger : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ!'ऑपरेशन टायगर 3' आठ दिवसांत मोठा स्फोट होणार, शिंदेंच्या विश्वासू नेत्याचा दावा

Maharashtra politics News : राज्यातील ठाकरे गटातील 14 आमदार येत्या आठ दिवसात शिवसेनेसोबत येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील राजकारणात गेल्या 15 दिवसापासून वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे. गेल्या दहा दिवसांत राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे समोर आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटले. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची घटना ताजी असतानाच आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या सचिन अहिर यांनी विधानपरिषदेच्या उपसभापतिपदाची संधी एकनाथ शिंदेनी दिली. त्यामुळे आहिर यांनी ठाकरेंची साथ सोडली.

त्यातच आता ऑपरेशन टायगर 3 राबवले जाणार असल्याचे सांगितले जात असतानाच याबाबत एकनाथ शिंदेंच्या लाडक्या नेत्याने मोठी अपडेट दिली असून राज्यातील ठाकरे गटातील 14 आमदार येत्या आठ दिवसात शिवसेनेसोबत येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

गेल्या आठ दिवसापासून राज्यात ऑपरेशन टायगर 3 बाबत चर्चा रंगली आहे. अनेक नेत्यांनी यावर सकारात्मक भाष्य केले आहे. अशातच आता एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी ऑपरेशन टायगर 3 बाबत सर्वात मोठी अपडेट दिली आहे. ‘लोक येतात जातात तुम्ही काळजी करू नका ब्रेकिंग न्यूज मिळत राहील, येत्या 8 दिवसात ऑपरेशन टायगर 3 होईल.’ असे भोंडेकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काळात काळात शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग होण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde
Shivsena News: 2019 ला 50 कॉल, खोटे गुन्हे, सागर बंगल्यावर पोलिस अन्...: एकनाथ शिंदेंचा ठाकरे-फडणवीसांविषयी धक्कादायक गौप्यस्फोट

गेल्या काही दिवसापासून आमदार फुटणार असल्याच्या चर्चेवरून दोन्ही शिवसेनेत (Shivsena) आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. अधिवेशन सुरु असतानाच राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही ऑपरेशन टायगर 3 बाबत भाष्य केले होते. मंत्री आबिटकर म्हणाले होते की, ऑपरेशन टायगर-3 कधी होईल तेही कळणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अनेक आमदार, माजी मंत्री येणार आहेत.

Eknath Shinde
uddhav thackeray : मातोश्रीवरील चाणक्य गाफील राहिल्याने शिंदेंनी गेम केला; विधीमंडळातील 'त्या' कागदाने फिरले राजकारण, पवारांनी केले ते ठाकरेंना का जमले नाही?

त्यानंतर ऑपरेशन टायगर 3 बाबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते व मंत्री यांनी देखील मोठे विधान केले होते. ऑपरेशन 3.0 सुरू झाले आहे. आता भूकंप होणार आहे. हे कधी होणार ते एकनाथ शिंदे ठरवणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या सर्वच नेत्यांनी आगामी काळात मोठा पक्षप्रवेश होण्याचे भाकित केले आहे. त्यामुळे लवकरच ऑपरेशन टायगर होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Eknath Shinde
uddhav thackeray : मातोश्रीवरील चाणक्य गाफील राहिल्याने शिंदेंनी गेम केला; विधीमंडळातील 'त्या' कागदाने फिरले राजकारण, पवारांनी केले ते ठाकरेंना का जमले नाही?

दरम्यान, त्यातच गेल्या काही दिवसापासून ऑपरेशन टायगर लवकरच होणार असल्याची चर्चा रंगली असतानाच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील ऍक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी मंगळवारी सायंकाळी सात वाजता त्यांच्या सर्व आमदारांची मातोश्रीवर बैठक बोलवली आहे. या बैठकीत ते सर्वांना मार्गदर्शन करणार असल्याचे समजते. त्यासोबतच यावेळी आमदारांना कानमंत्र देणार असल्याचे समजते. या पुढील काळातही आमदार फोडण्याची शक्यता गृहीत धरून उद्धव ठाकरे आमदारांना काय सूचना देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde
BJP Vs MNS: 'मी फुसक्या अन् बिनविषारी सापांबद्दल...', भाजप आमदाराकडून पहिल्यांदाच राज ठाकरेंवर जिव्हारी लागणारा वार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com