Shivsena News: 2019 ला 50 कॉल, खोटे गुन्हे, सागर बंगल्यावर पोलिस अन्...: एकनाथ शिंदेंचा ठाकरे-फडणवीसांविषयी धक्कादायक गौप्यस्फोट

Shivsena Vs BJP : एकीकडे राज्यात एकनाथ शिंदेंनी 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाल्यानंतर तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानाने प्रवास केला. या प्रवासात ठाकरे अन् फडणवीस या दोन नेत्यांमध्ये राजकीय चर्चाही झाल्याचंही बोललं जात आहे.
Uddhav Thackeray–Devendra Fadnavis Eknath Shinde
Uddhav Thackeray–Devendra Fadnavis Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: एकीकडे राज्यात एकनाथ शिंदेंनी 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाल्यानंतर तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानाने प्रवास केला. या प्रवासात ठाकरे अन् फडणवीस या दोन नेत्यांमध्ये राजकीय चर्चाही झाल्याचंही बोललं जात आहे. या दोन्ही नेत्यांनी एकत्र प्रवासानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याचदरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीस-ठाकरे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार फोडल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. ठाकरेंचे विश्वासू नेते म्हणून ओळख असलेल्या आमदार सचिन अहिर यांना विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला आहे. हा ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी मंगळवारी (ता.30) एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. ते म्हणाले, ठाकरे हे आमच्या सहा खासदारांच्या मतदारसंघात गेले होते. यावेळी त्यांनी या सर्व खासदारांना शिव्यांची लाखोली वाहिली. आता त्यांचं स्वागत सचिन अहिर यांनी केलं आहे.

यावेळी एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी हे काही ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही, देवेंद्रजींचे पंख छाटण्याचे काम सुरू असल्याच्या टीकेवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना माझ्यासमोर 50 कॉल केले, पण यांनी एकही उचलला नाही. त्यावेळी त्यांची भाषा एक तर तू राहशील,नाहीतर तू राहशील अशी होती.

Uddhav Thackeray–Devendra Fadnavis Eknath Shinde
Aditya Thackeray news : आदित्य ठाकरेंची आमदारकी धोक्यात; एकनाथ शिंदेंकडून फुलप्रूफ तयारी

अशी भाषा बोलणारे, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्यांनी देवेंद्र फडणवीसांवर खोटे गुन्हे दाखल करुन त्यांच्या सागर बंगल्यावर पोलिस पाठवले होते,अशी खोचक आठवण यानिमित्तानं एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

तसेच सागर बंगल्यावर पोलिस पाठवण्यापर्यंत खालची पातळी गाठणारे,अशाप्रकारचं एकदम त्यांना पुतनामावशीचं प्रेम आलं आहे. हे मगरमच्छ के आँसू आहेत. हे देवेंद्रजी हुशार आहेत, त्यांना कळतं सगळं कळतं. त्यामुळे यापेक्षा जास्त काही यावर बोलण्याची आवश्यकता आहे. असंकाही मला वाटत नाही. यावर आणखीही उदाहरणे मला देता येतील असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Uddhav Thackeray–Devendra Fadnavis Eknath Shinde
Gokul: गोकुळच्या मैदानात महायुतीतील 'मोठा भाऊ' कोण? मुश्रीफांचा दावा, महाडिकांचा पलटवार, चंद्रदीप नरकेंचा दोघांनाही टोला

तसेच काही लोकं आता तुडवण्याची भाषा करत असल्याचा टोलाही एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर केला. यावेळी त्यांनी आम्ही तुडवणारे नसून जोडणारे लोक आहोत,असं ठणकावून सांगितलं. शब्दाला किंमत देणारी आमची ही संघटना आहे. त्यामुळे लोक स्वत:हून पक्षात येत असल्याचंही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंच्या पक्षफुटीवर बोलताना राज्यात सहा खासदारांनी सोबत येण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. तसेच खासदार म्हणजे 20-25 लाख लोकांमधून निवडून येणारा लोकप्रतिनिधी असतो. आपण का शिवसेनेत येतो हे प्रत्येकाने सांगितलं. जनतेला आणि मतदारसंघाला न्याय दिला पाहिजे. त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे आणि नेत्याने संकट काळात उभे राहिले पाहिजे ही माफक भावना असते. त्यामुळेच सर्व लोक येत आहे. थेट विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर केली.तसेच

Uddhav Thackeray–Devendra Fadnavis Eknath Shinde
Sub Classification: SC प्रवर्गातील उपवर्गीकरणाला विरोध, मुंबईत दलित समाज दाखल; उपवर्गीकरण होणार का? विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

एकनाथ शिंदे म्हणाले, गोकुळ गीते यांनीही निवडून आल्यावर सहयोगी सदस्य म्हणून काम सुरू केलं आहे. कोणत्याही प्रकारचं आम्ही तोडकाम करत नाही. जोडकाम करतो. आम्ही तोडायला नाही जुडवायला आलो आहे. काही लोक तुडवायला आले. आम्ही शिवसेना वाढवायला आलो असा टोला त्यांनी लगावला.

काही लोक सोडून गेल्यावर त्याबाबत चर्चा करतात. तो असेपर्यंत चांगला. त्यांचं सध्या आपला तो बाब्या दुसऱ्याचं कार्ट असं सुरू आहे. आताही काही लोकं काही म्हणतात त्यावर मी बोलणार नसल्याचंही शिंदे यांनी म्हटलं.

आमचा अजेंडा खुर्ची नाही. ज्या लोकांनी खुर्चीत बसवलं त्यांचे प्रश्न सोडवणं हा आमचा अजेंडा आहे. काही लोक सोडून गेल्यावर त्याबाबत चर्चा करतात. असे पर्यंत चांगला. आपला तो बाब्या दुसऱ्याचं कार्ट असं सुरू आहे. आताही काही लोकं काही म्हणतात त्यावर मी बोलणार नसल्याचंही शिंदे यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com