Operation Tiger Active : ठाकरेंचे टेन्शन वाढणार! मंत्र्यांने दिली कबुली, ऑपेरशन टायगर अ‍ॅक्टिव्ह, तारीख वेळ अन् वार...

Uday Samant vs Uddhav Thackeray : ऑपरेशन टायगर अ‍ॅक्टिव्ह असल्याची कबुली एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याने दिली आहे. मागील दोन वेळा ऑपरेशन यशस्वी झाले आता तिसऱ्यांदा देखील ऑपरेशन करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले.
Eknath Shinde Uddhav Thackeray
Operation Tiger Eknath Shinde Uddhav Thackeray sarkarnama
Published on: 
Updated on: 

Uday Samant News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना पक्षविस्तारासाठी आक्रमक झाली आहे. संघटनात्मक बांधणी करत कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर पक्षाकडून घेतली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदेंचे एक पोस्टर व्हायरल झाल्याने राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायर राबवले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यातून थेट उद्धव ठाकरेंना धक्का देण्याची तयारी असल्याची बोलले जात होते.

ऑपरेशन टायगर राबवले जाणार की नाही याची चर्चा सुरू असताना मंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर अ‍ॅक्टिव्ह असल्याची कबुली दिली आहे.

ते म्हणाले की, 'ज्यावेळी चार वर्षापूर्वी ऑपरेशन टायगर झालं त्यावेळी त्याची तारीख वेळ देखील माहिती नव्हती. दुसऱ्यांदा ऑपरेश टायगर राबवले त्याची वेळ आणि तारीख देखील कोण माहिती नव्हती. आता पुन्हा ऑपरेशन टायगर होणार आहे.मात्र, तारीख आणि वेळ सांगणार नाही.'

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सोशल मीडियावर एक पोस्टर व्हायरल झाले होते. या पोस्टरवर एकनाथ शिदेंचा फोटो आणि 'वेट अँड वॉच 3.0' असा मजकूर होता. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर 3.0 राबवले जात असल्याची चर्चा आहे.

Eknath Shinde Uddhav Thackeray
Ajit Pawar NCP MLAs : शरद पवारांच्या संपर्कात अजितदादांचे 22 ते 26 आमदार? फडणवीस अलर्ट; महायुतीत मोठी खळबळ!

संघटनात्मक बांधणीवर भर

सातारा जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून संघटनात्मक बांधणीवर भर दिला जात आहे. त्यामध्ये तालुकानिहाय बैठकांचे सत्र राबवून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संघटन विस्ताराची दिशा येण्यात आली. सुमारे १२ हजार सभासदांची नोंदणी करण्यात आली असून, त्यापैकी तीन हजार सक्रिय सभासदांची फळी तयार करण्यात आली आहे. गावागावांत काम करणाऱ्या कार्यकत्यांची फळी तयार केली जात आहे.

Eknath Shinde Uddhav Thackeray
Operation Tiger : ऑपेरशन टायगर 3.0! एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत, आमदार फोडणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.