INDIA alliance meeting : उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीला दिल्लीला गेले नाहीत! एकनाथ शिंदेंनी उडवली खिल्ली; पडद्यामागचे 'ते' कारण केले उघड!

Delhi opposition meeting News : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ऑनलाईन हजर होते. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्यक्ष हजर नव्हते. त्यांनी ऑनलाईन बैठक अटेंन्ड केली, त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
Uddhav-Thackeray-Eknath-Shinde
Uddhav-Thackeray-Eknath-ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : इंडिया आघाडीची सोमवारी दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीस देशभरातील इंडिया आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीला देशभरातून एकूण 25 राजकीय पक्ष सहभागी झाले होते. त्यामध्ये, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे तिन्ही प्रमुख पक्षांचा सहभाग होता. त्यामध्ये, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंची दिल्लीतील बैठकीला उपस्थिती होती, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ऑनलाईन हजर होते. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्यक्ष हजर नव्हते. त्यांनी ऑनलाईन बैठक अटेंन्ड केली, त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

उद्धव ठाकरे या बैठकीला प्रत्यक्ष का उपस्थित नव्हते? यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. यावेळी उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीच्या बैठकीला दिल्लीला का गेले नाहीत याचे पडद्यामागील कारण उघड केले आहे.

दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडली. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची ही पहिलीच बैठक असल्याने प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या उपस्थितीतकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या बैठकीपूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांची गळाभेट लक्षवेधी ठरली. मात्र एवढी महत्त्वाची बैठक असूनही उद्धव ठाकरे या बैठकीला प्रत्यक्ष हजर नव्हते, त्यांनी ऑनलाईन बैठक अटेंन्ड केली, त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

Uddhav-Thackeray-Eknath-Shinde
Dharashiv Political developments : धाराशिव ZP अध्यक्षपदावरून राजकीय रणसंग्राम! अंतिम फैसला आता मुंबईत, CM फडणवीसांच्या निर्णयाकडे लक्ष!

या बैठकीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दिल्लीत आले नसल्याने इंडिया आघाडीमधून बाहेर पडणार का? अशी देखील चर्चा सुरू आहे. मधल्या काळात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यासोबतच मिलिंद नार्वेकर यांनी एसएमएस केले होते, असा प्रश्न यावेळी एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी विचारला, या प्रश्नला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केले आहे.

Uddhav-Thackeray-Eknath-Shinde
Shivsena News: शिवसेनेत लवकरच भाकरी फिरणार, कोणाला मिळणार संधी, तर कोणाला डच्चू? पुण्यात कारवाईचा पहिला दणका; शिंदेंनी दिले मोठे संकेत

एकनाथ शिंदे (Eknath shinde) म्हणाले, 'आता मी आपल्याला एकच सांगतो. हा जो निरुत्साह दिसून येत आहे, तो म्हणजे हे गलीतगात्र झालेले लोक आहेत. मगाशी मी सांगितले, इंडिया आघाडीमध्ये आल्यानंतर पराभव होतो, अशा प्रकारचा विश्वास त्यांना निर्माण झाला आहे आणि म्हणून या बैठकीपासून काही लोक दूर झाले आहेत'

Uddhav-Thackeray-Eknath-Shinde
Operation Tiger : एकनाथ शिंदें मोठा धमाका, उद्धव ठाकरेंचे 8 खासदार फुटणार? रात्रीची बैठक अन्...

दरम्यान, दिल्लीमध्ये सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शिवसेना पक्ष भविष्यात कसा वाढवायाच यावर चर्चा झाली. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Uddhav-Thackeray-Eknath-Shinde
Operation Tiger : एकनाथ शिंदें मोठा धमाका, उद्धव ठाकरेंचे 8 खासदार फुटणार? रात्रीची बैठक अन्...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com