

Eknath Shinde Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडत सहा खासदारांनी बंड केले होते. हे खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर लोकसभाध्यक्षांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून पत्र देत अपात्रतेची कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या.मात्र, एकनाथ शिंदेंचे ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्येच पुरावे समोर आले आहेत.
17 जूनलाच फुटलेल्या खासदारांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जात असल्याचे स्पष्ट केले होते. आणि त्यांनी 22 जूनला मुंबईत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर'चे हे अत्यंत गोपनीय फोटो अखेर समोर आले आहेत. 17 जूनला ठाकरेंचे 6 खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी त्यांना भेटल्याचे दिसत आहे. श्रीकांत शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईक हे देखील या खासदारांसोबत उपस्थित असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.
निधी मिळत नाही, विकासकामे, ठाकरे भेटत नाही अशी कारणे सांगत खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली होती. मात्र. ९ पैकी सहा खासदार फुटले नसते तर इतर खासदारांना पक्षांतरबंदी कायद्या अंतर्गत अपात्र ठरवले गेले असते. ओमराजे निंबाळकरांची भूमिका देखील तळ्यातमळ्यात होती. त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी होणार की नाही याची चर्चा सुरू होती.
ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आपण शिंदेंसोबत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे हे ऑपरेशन यशस्वी झाल्याच्या चर्चा होत्या. आता थेट 17 जूनचे फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये या खासदारांनी लोकसभाध्यक्षांची भेट घेतल्याचे दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.