

Nagpur News : राज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे. दिवाळखोरीकडे वाटचाल झालेली नाही. योजना पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे पैसे आहेत. 92 टक्के शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. आठ टक्के शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवत आहे. त्यासोबतच राज्यातील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषद सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. दुसरीकडे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी विरोधी पक्षनेतेपदाची निवड करावी, अशी विरोधकांची सर्वात मोठी मागणी फडणवीस, शिंदेंनी अधिवेशनाआधीच टोलवत हा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील, असे स्पष्ट केले.
या अधिवेशनात 18 विधेयक मांडणार आहोत. सर्व विधेयक मंजूर करून घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. जास्तीत जास्त कामकाज करण्याची आमची तयारी आहे. त्यासाठी शनिवारी व रविवारी कामकाज ठेवण्यात आले आहे.असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
दरम्यान, रविवारी सायंकाळी नागपुरात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीला सर्व मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर टीका केली. एकीकडे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला. तर दुसरीकडे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
विरोधकांच्या पत्रकार परिषदेत अनेक गंमती झाल्या. भास्कररावांनी वडेट्टीवारांच्या माईकची बॅटरी बंद केली, असे म्हणत फडणवीसांनी जोरदार टीका केली. त्यासोबतच विदर्भातील बदल वडेट्टीवारानी (Vijay wadettiwar) पहावे, त्यामुळे त्यांनी अशी मागणी करू नये. राज्याची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्यातील 92 टक्के शेतकऱ्यांना मदत दिली आहे. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना मदत केली आहे. राज्य सरकारने हात आखडता घेतलेला नाही. राज्यातील नुकसान झालेल्या जवळपास 92 टक्के शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. आठ टक्के शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.