Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यातील शहीद जवानांची नावं सरकारने लपवली, काँग्रेसचा गंभीर आरोप; 'तो' व्हिडिओ दाखवला

Pahalgam Attack Congress Martyred Soldiers : पहलगाम हल्ल्यातील शहीद जवानांची नावे मागील वर्षभरापासून सरकारने लपवून ठेवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. राजनाथ सिंह यांचा संसदेतील व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे.
Congress has accused the Central Government of concealing the identities of six soldiers martyred in the Pahalgam terror attack, triggering a political controversy over transparency and national security.
Congress has accused the Central Government of concealing the identities of six soldiers martyred in the Pahalgam terror attack, triggering a political controversy over transparency and national security.sarkarnama
Published on
Updated on

Pahalgam Attack News : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून पहलगाम येथे हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात तब्बल 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले होते. आता सरकारने हल्लात शहीद झालेल्या सहा जवानांची नावे लपवून ठेवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे.

काँग्रेस नेते पवन खेडा यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय सैन्याचे ६ जवान शहीद झाले होते. या ६ वीर जवानांची नावे आणि त्यांचे सर्वोच्च बलिदान भाजप सरकारने तब्बल एक वर्ष देशापासून लपवून ठेवले.'

'नेहमी राष्ट्रवादाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारने या खऱ्या हिरोंचा (शहीद जवानांचा) योग्य तो सन्मान नाकारला असून, ही गोष्ट अत्यंत लाजीरवाणी आहे.', अशी टीका खेडा यांनी केली आहे.

शहीद झालेले जवान

पवन खेडा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुख्यालय १० इन्फंट्री ब्रिगेडचे सुभेदार मेजर पवन कुमार, जम्मू आणि काश्मीर लाइट इन्फंट्रीचे रायफलमॅन सुनील कुमार (वीर चक्र), फील्ड रेजिमेंटचे लान्स नायक दिनेश कुमार, ८५१ लाइट रेजिमेंटचे एव्हिएशन टेक्निशियन मूड मुरलीनाईक, २३७ फील्ड वर्कशॉप कंपनीचे हवालदार सुनील कुमार सिंग, ३९ विंगचे सार्जंट सुरेंद्र कुमार (वायू पदक) हे भारताचे ते शूर सुपुत्र आहेत ज्यांनी पहलगामवरील हल्ल्यानंतर भारताचा सन्मान आणि आपल्या बहिणींचे सौभाग्याचे रक्षण करताना आपल्या प्राणांचे बलिदान दिले.

Congress has accused the Central Government of concealing the identities of six soldiers martyred in the Pahalgam terror attack, triggering a political controversy over transparency and national security.
RBI News : भारतात पुन्हा नोटबंदी! 2005 पूर्वीच्या महात्मा गांधी सिरीजच्या नोटा टप्प्याटप्प्याने बंद; 30 जूनपर्यंत बदलून घ्याव्या लागणार

राजनाथ सिंह यांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पहलगाम हल्ल्यानंतर संसदेत उत्तर देताना हल्ल्यामध्ये भारतीय सैनिकांची हानी झाली नाही, असे उत्तर दिले होते. त्यांचा तो व्हिडिओ पवन खेडा यांनी आपल्या ट्विटरवर शेअर करत म्हटले आहे की, दोनच शक्यता आहेत की, राजनाथ सिंह हे जेव्हा संसदेत बोलत होते तेव्हा त्यांना सैनिक शहीद झाले याची माहिती नव्हती.जर असे असेल तर गंभीर प्रश्न उपस्थित होतो की, ज्या मंत्रालयाचा कारभार त्यांच्याकडे आहे त्याच मंत्रालयाच्या संबंधीत घटनांची माहिती नाही. किंवा त्यांना सत्य माहीत होते मात्र त्यांनी दिशाभूल करण्याचा मार्ग निवडला. जे काही सत्या आहे ते आता बदलू शकत नाही.

Congress has accused the Central Government of concealing the identities of six soldiers martyred in the Pahalgam terror attack, triggering a political controversy over transparency and national security.
Nagpur News: काँग्रेस नेत्याला विश्वास नांगरे पाटलांकडून ‘एन्काऊंटर’ची भीती; फडणवीसांच्या होमटाऊनमध्ये नेमकं चाललंय काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com