

Vishwas Nangre Patil News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होमटाऊनमध्ये आयपीएस अधिकारी आणि नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच नागपुरातील राजकीय वातावरण तापलं आहे.
नागपुरातील काँग्रेस नेत्याने नांगरे पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत. "विश्वास नांगरे पाटील 'अर्बन नक्षल' म्हणून माझा एन्काऊंटर (Encounter) करतील," अशी थेट भीती नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील (Praful Gudadhe Patil) यांनी व्यक्त केली आहे.
नांगरे पाटील यांनी एका कार्यक्रमाला उपस्थित लावून भाषण केले. यावरुन त्यांच्या विचारसरणीवर आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह गुडघे पाटलांनी उपस्थित केले आहेत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काल ‘एक्स’वरील पोस्टद्वारे आयपीएस अधिकाऱ्यांच्या संविधाननिष्ठा, प्रशासकीय तटस्थता आणि सार्वजनिक आचरणाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. आज मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही नांगरे पाटलांचा समाचार समाज माध्यमावर घेतला आहे.
"विश्वास नांगरे पाटील नागपुरात रुजू होण्यापूर्वीच त्यांच्याबद्दल आमच्या मनात अविश्वासाचे वातावरण आहे, बिगर हिंदू धर्मीयांच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली आहे. हिंदू संमेलनातील त्या व्हिडिओत विश्वास नांगरे पाटील फक्त संघाचे समर्थन करत नाहीयेत, तर ते मुळात 'असंवैधानिक संकल्पना' असलेल्या 'हिंदू राष्ट्र'चेही समर्थन करत आहेत.," असे गुडघे पाटलांनी म्हटले आहे.
ते एक पोलीस अधिकारी असल्याने, त्यांचे विचार निरपेक्ष आणि निधर्मी असले पाहिजेत. मात्र विश्वास नांगरे पाटील त्यांच्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह 'हिंदू राष्ट्र' या असंवैधानिक संकल्पनेचाही पुरस्कार करताना दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
विश्वास नांगरे पाटलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावर जाऊन भाषण केलं होते. त्यामुळे काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नांगरे पाटलांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वर्दीतला अधिकारी की संघ प्रचारक? असा थेट सवाल राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.