NCP News : राष्ट्रवादीला सुट्टीच नाही... आणखी एका मतदारसंघात भाजपने सुरु केली 2029 ची तयार

NCP News : शहापूर मतदारसंघात गेल्या तीन दशकांपासून दरोडा विरुद्ध बरोरा हेच एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. आता बरोरा यांनी भाजप प्रवेश केल्याने शहापूरमधील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
Pandurang Barora Join BJP
Pandurang Barora Join BJPSarkarnama
Published on
Updated on

NCP Vs BJP News : कागलचे शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे आणि त्यांचे पुत्र, गोकुळ दूध संघाचे संचालक अंबरीश घाटगे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. कागलमध्ये सध्या मंत्री हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. पण 2029 मधील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने घाटगे पिता-पुत्राचा भाजप प्रवेश महत्वाचा मानला जात आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या शहापूर मतदारसंघातही भाजपने माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना पक्षात घेतले आहे. गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दौलत दरोडा यांनी धूळ चारली होती. आता बरोरा यांनी भाजप प्रवेश केल्याने शहापूरमधील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.

Pandurang Barora Join BJP
Kolhapur Politics : संजय घाटगेंचा भाजप प्रवेश; मुश्रीफ अन् फडणवीसांनी मिळून केला समरजीत घाटगेंचा कार्यक्रम!

दोन प्रमुख विरोधक महायुतीतच :

शहापूर मतदारसंघात गेल्या तीन दशकांपासून दरोडा विरुद्ध बरोरा हेच एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. 1995 मध्ये शिवसेनेचे दौलत दरोडा यांनी काँग्रेसच्या महादू बरोरा यांचा पराभव केला. महादू बरोरा हे पांडूरंग बरोरा यांचे वडील आहेत. 1999 च्या निवडणुकीतही हाच निकाल कायम राहिला. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र महादू बरोरा यांनी दौलत दरोडा यांचा पराभव केला.

2009 मध्ये महादू बरोरा यांचे पुत्र पांडुरंग बरोरा मैदानात उतरले. त्यांनी दौलत दरोडा यांना आव्हान दिले. मात्र पांडुरंग बरोरा यांना पहिल्याच निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. दौलत दरोडा शिवसेनेच्या तिकिटावर तिसऱ्यांदा आमदार झाले. 2014 मध्ये मात्र बरोरा यांनी दरोडा यांना धूळ चारलीच.

Pandurang Barora Join BJP
Karad Politics : साहेबांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांना मिळालाय खमका नेता... उंडाळकरांमुळे 3 तालुक्यात वाढणार बळ!

2019 मध्ये मात्र राजकीय समीकरण बदलली. बरोरा यांनी भविष्यातील राजकीय संधींचा विचार करून शिवसेनेत प्रवेश केला. तर तिकीट कापल्याने नाराज झालेल्या दरोडा यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या दोघांच्या लढाईत पुन्हा एकदा दौलत दरोडा यांचा विजय झाला. राष्ट्रवादीतील फुटीनंतर दौलत दरोडा यांनी अजित पवार यांचे नेतृत्व मान्य केले.

2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला गेली. त्यामुळे पांडुरंग बरोरा यांनी तुतारी फुंकली. पण सलग दुसऱ्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यांचा हा तिसरा पराभव ठरला होता. त्यातूनच पांडुरंग बरोरा अस्वस्थ असल्याची चर्चा होती. गट आणि कार्यकर्ते टिकवण्यासाठी त्यांना सत्तेची गरज भासू लागली होती.

अखेर माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वात पांडुरंग बरोरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बरोरा यांच्या पक्ष प्रवेशानंतर भाजपाची शहापुरातील ताकद वाढण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी स्थानिक राजकीय समि‍करणेही बदलू शकतात. बरोरा यांना भाजपने ताकद दिल्यास आणि ते दरोडा यांना वरचढ ठरल्यास आगामी निवडणुकीत भाजप इथे हक्क सांगू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com