

बँकिंग क्षेत्रात कुरिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) लोकल बँक ऑफिसर (LBO) पदांसाठी एकूण 545 रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये ही भरती होणार असून महाराष्ट्रासाठी 67 पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 20 जुलै 2026 पासून सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 9 ऑगस्ट 2026 आहे. ऑनलाइन लेखी परीक्षा ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2026 दरम्यान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांनी वेळ न दवडता अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
महाराष्ट्रासाठी राखीव असलेल्या 67 जागांमध्ये 12 जागा अनुसूचित जाती (SC), 10 जागा अनुसूचित जमाती (ST), 7 जागा इतर मागासवर्ग (OBC), 14 जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि 24 जागा खुल्या प्रवर्गासाठी (UR) निश्चित करण्यात आल्या आहेत. याशिवाय दिव्यांग उमेदवारांसाठी 5 पदे आरक्षित ठेवण्यात आली आहेत.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच 1 जुलै 2026 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. सरकारी नियमानुसार SC, ST, OBC आणि दिव्यांग उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत लागू राहील.
अर्जदाराकडे अनुसूचित व्यावसायिक बँक किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेत किमान 1 वर्षाचा लिपिक किंवा अधिकारी म्हणून कामाचा अनुभव असणे बंधनकारक आहे. महाराष्ट्रातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मराठी भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे आवश्यक आहे. दहावी किंवा बारावीत मराठी विषय नसलेल्या उमेदवारांना स्थानिक भाषा प्राविण्य परीक्षा (LLPT) द्यावी लागेल.
निवड झालेल्या उमेदवारांना 48,480 ते 85,920 या वेतनश्रेणीनुसार पगार मिळणार असून त्यासोबत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय सुविधा तसेच इतर विविध भत्त्यांचाही लाभ मिळेल. सर्व भत्ते मिळून मासिक वेतन 1 लाखांपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.