Pankaja Munde : हाके यांच्या उपोषणाची मायबाप सरकारने गांभिर्याने दखल घ्यावी, पंकजा मुंडे यांची मागणी

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही तर कसा लागत नाही? आणि आत्ताच्या ज्या कुणबी नोंदी दिल्या जात आहेत. शासनाच्या संरक्षणमध्ये खाडाखाडी करून कुणबी नोंदी चे प्रमाणपत्र दिले जात आहेत, याच लेखी उत्तर सरकार ने द्यावे.
Pankaja Munde
Pankaja Munde Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी सुरू केलेल्या उपोषणाचा सोमवारी पाचवा दिवस आहे. राज्य सरकारचे शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीसाठी जालना -वडीगोद्री येथे दाखल झाले आहे. ओबीसी नेते हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषणाची मायबाप सरकारने गांभिर्याने दखल घ्यावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली आहे.

मराठा (Maratha) समाजाला आरक्षण देताना ओबीसीला धक्का लागणार नाही, याची लेखी हमी सरकारने द्यावी या मागणीसाठी हाके यांनी उपोषण सुरू केले आहे. गेल्या चार दिवसांपासून हाके व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे.गेल्या चार दिवासांपासून ,सुरू केलेले आंदोलन मागे घ्यावे, यासाठी अनेक नेते हाके यांच्या भेटीला येत आहेत.

Pankaja Munde
Pankaja Munde : पंकजा मुंडे रडल्या! म्हणाल्या, '...मी राजकारण सोडून देईन'

हाके म्हणाले, एका बाजूला राज्य सरकार आणि सर्वच पक्षाचे प्रमुख ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही असे म्हणत आहेत. मात्र त्याचवेळी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आम्ही ओबीसीत मराठा समाज घुसवला असे म्हणत आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाच्या मनामध्ये चिंतेचे वातावरण असून ओबीसी समाजाला डावलल्याची भावना आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही तर कसा लागत नाही? आणि आत्ताच्या ज्या कुणबी नोंदी दिल्या जात आहेत. शासनाच्या संरक्षणमध्ये खाडाखाडी करून कुणबी नोंदी चे प्रमाणपत्र दिले जात आहेत, याच लेखी उत्तर सरकार ने द्यावे.

Pankaja Munde
Video OBC Reservation : "मराठा समाज फक्त 10 टक्के, OBC आरक्षणाला विरोध कराल, तर चुन-चुन के...", शिंदे सरकारला कुणी दिला इशारा?

हाके यांनी सुरु केलेल्या आंदोलनाची दखल घ्यावी, असे ट्विट पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले आहे. त्या म्हणाल्या प्रा.लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. त्यांनी पाणी देखील सोडले आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे.शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गाना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पहावे.

लक्ष्मण हाके यांच्या मागण्या काय?

- कुणबीच्या लाखो बोगस नोंदीची त्वरित दखल घेवून त्या रद्द करण्यात याव्यात.

- ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी.

- ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मूळ आरक्षणात मराठा समाजाचा समावेश करू नये. तसे लेखी आश्वासन मुख्यमंत्री महोदयाकडून मिळाले पाहिजे.

- ओबीसीच्या वसतिगृहाची प्रत्येक जिल्हात योजना कार्यान्वित व्हावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com