Pankaja Munde : पहिल्याच बैठकीत पंकजा मुंडेंनी अंग झटकले? राखेचा विषय निघताच म्हणाल्या, 'आपली भूमिका फक्त...'

Illegal Fly Ash Transport : भाजपने ज्या जिल्ह्यात आपले पालकमंत्री नाहीत अशा ठिकाणी संपर्कमंत्री नेमले आहेत. मंत्री पंकजा मुडे यांच्याकडे बीडच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. बुधवारी (ता.12) पहिलीच बैठक झाली.
Pankaja Munde
Pankaja Munde Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बीडमधील राखेतील गैरप्रकार, गैरव्यवहार आणि वाढती गुन्हेगारी यावर बोट ठेवले होते. यानंतर हाच मुद्दा बुधवारी (ता.12) झालेल्या पहिल्याच बैठकीत संपर्कमंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर आला. यावेळी त्यांनी आपले अंग काढत, पर्यावरण रक्षण एवढीच आपली भूमिका असल्याचे सांगितल्याने बीड जिल्ह्यातील राखेतील गुन्हेगारी मोडीत निघणार का? असा सवाल आता अधिकाऱ्यांना देखील पडला आहे.

पंकजा मुंडे यांनी संपर्कमंत्री म्हणून पहिलीच बैठक घेतली. यावेळी परळीमधील 40 गुन्ह्यांची यादीच महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर ठेवली. तसेच राखेच्या अवैध धंद्यातील गावगुंडगिरी, होणारी मारहाण, औष्णिक वीज केंद्रावरील दगडफेक अशा घटनांचा पाढाच वाचला. तसेच राखेतील गुन्हेगारांविषयी विविध विभागांना केलेल्या पाठवलेल्या 42 पत्रांचा उल्लेख केला. यावेळी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देखील माहिती दिल्याचे सांगण्यात आले.

यावेळी पर्यावरण रक्षण एवढीच आपली भूमिका आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माहिती दिली जाईल. एवढेच उत्तर त्यांनी दिले. यामुळे त्या ही माहिती मुख्यमंत्र्यांना दिली का? हे स्पष्ट होऊ शकले नाही.

Pankaja Munde
Suresh Dhas VS Pankaja Munde : पंकजाताई, तुम्ही शिट्टीवाले, घड्याळवाल्यांवर प्रेम करा, भाजपवाल्यांसाठी आम्ही काफी; सुरेश धसांचा पलटवार

बीडमधील राखेतील गुन्हेगारांविषयी अनेकांनी आवाज उठवला असून भाजप आमदार देखील याबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. अधिकाऱ्यांनी देखील याबाबत सरकारच्या वरिष्ठांपर्यंत माहिती पोहचवली आहे. आतातर संपर्कमंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर देखील अधिकाऱ्यांनी गाऱ्हाणी मांडणी आहेत.

राखेतील गुन्हेगारी कशी?

राखेतील गैरव्यवहारांची माहिती सादर करताना अधिकाऱ्यांनी, कोरडी आणि ओली राख यांच्या निविदा काढण्यात आल्याची माहिती दिली. कोरडी राखेच्या उचलीसाठी 12 निविदा पात्र ठरल्या असून सध्या काम सुरळीत सुरू आहे.

Pankaja Munde
Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी वाढविले सुरेश धस यांचे टेन्शन; म्हणाल्या, ‘आता मला आष्टीवर जास्तच प्रेम करावं लागेल...’

वीजनिर्मितीवेळी तयार होणाऱ्या राखेवर पाणी मारले जाते. या ओली राखेसाठी देखील 18 निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यासाठी वाहतूकदार निवडले होते. ही ओली राख येथील परळी औष्णिक वीज केंद्राच्या तलावात साठवली जाते. तेथूनच राखेचा उठाव होतो. मात्र सध्या गावगुंडांची दहशतीमुळे राखेतील गुन्हेगारी वाढल्याची हकीकत संपर्कमंत्र्यांच्या समोर अधिकाऱ्यांनी मांडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com